manoj jarange patil chhaghan bhujbal 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: कोणत्या दुकानात शिरायचं अन् बाहेर पडायचं हे भुजबळांना चांगलं माहितेय; जरांगेंचा निशाणा

कार्तिक पुजारी

मुंबई- अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या हक्काचं आरक्षण आहे. त्यामुळे ते आम्हाला मिळणार आहे आणि ते आम्ही मिळवणारच. आमचं आरक्षण आतापर्यंत तुम्हाला दबावापोटी देण्यात आलं. आता मराठ्यांना लक्षात आलंय की आमचं आरक्षण तिथं आहे. त्यामुळे ते आम्हाला मिळायला लागलं आहे, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

आतापर्यंत तुम्ही आमचं आरक्षण खाल्लं आहे. आमचंच आरक्षण आम्हाला आता मिळणार आहे. ओबीसी समाज काही बोलणार नाही, त्यांना जाणीव आहे. आम्ही तुमचं कुठं कमी करत आहोत. छगन भुजबळ सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही ओबीसी ओबीसी म्हणून तुणतुणे वाजवायचे, धनगर बांधवांच्या आंदोलनाकडे गेले का नाही? असा सवाल जरांगेंनी विचारला.

मागच्या दारातून कोण एंट्री देतंय. त्यांच्यासाठी दुकान कोण खोलतंय, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणाले की, दुकान आणि दारं त्यांना जास्त माहिती आहेत. आमचं हक्काचं आहे ते आम्हाला मिळणार आहे. दुकानं आणि दारांत ते माहीर आहेत. कोणत्या दुकानात शिरायचं आणि कोणत्या दुकानातून बाहेर पडायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे. आता ते बाहेर आले आहेत.

निवृत्त न्यायमूर्ती जरांगेंकडे जाऊन हात जोडत आहेत, अशी टीका भुजबळांनी केली होती. यावर जरांगे पाटील म्हणाले की, 'कोणीही कोणासमोर हात जोडलं नाही. ते एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आले होते. न्यायपालिकेचे तेच काम आहे.' हिंसाचाराच्या घटनेची चौकशी झाली पाहिजे, आमचीही हीच मागणी आहे. आंतरवाली सराटीमधील लाठीहल्ल्याबाबत देखील एसआयटी बसवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

हिंसाचाराबाबत चौकशी केली पाहिजे. आम्ही हिंसाचाराचं समर्थन केलं नाही. सर्व अधिकाऱ्यांची उच्च स्तरीय चौकशी व्हायला हवी. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. दुसऱ्यांनाच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. माझी सरकारला विनंती आहे त्यांनी याची चौकशी करावी. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, असं जरांगे पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निफ्टी आणखी 1,000 अंकांनी घसरू शकतो; शेअर बाजारात सातत्याने का कोसळत आहे?

आज नाही जन्मदिन नाही पुण्यतिथी तरीही गुगलने का बनवला सुप्रसिद्ध गायक केके यांचं डुडल ?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

SCROLL FOR NEXT