मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण असा प्रश्न विचारणाऱ्या राज ठाकरे यांचा बोलविता धनी कोण, असा सवालही त्यांनी केला.
अकोला : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात झालेल्या ओबीसी बचाव एल्गार सभेवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी त्यांच्यावर टीका केली. आरक्षणाच्या प्रश्नावरून दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी संवाद मेळावे घेत आहोत. वेगवेगळ्या समाज घटकांना एकमेकांमध्ये झुंजवण्याचे काम सुरू असून, याची जाणीव करून देण्यात येत आहे.
संविधानाच्या चौकटीत राहून ओबीसी- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊ शकतो. मात्र दोन्ही समाजाला झुंजवण्याचे कारण काय, असा सवाल ॲड. आंबेडकर यांनी केला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी गावातून आंदोलनाला प्रारंभ केला. याच जिल्ह्यातील अंबड येथे छगन भुजबळ यांनी आव्हान दिले. हे राजकारणातील आव्हान कशासाठी, असा सवाल करीत आपण एकमेकांचे वैरी नाहीत. त्यामुळे आरक्षणासह प्रत्येक प्रश्न घटनेच्या चौकटीत राहूनच सोडवता येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे करीत असताना कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचीही काळजी घेता येते. मात्र या मुद्दावर अभ्यास न भाष्य करण्यात येत आहे. आरक्षणाचा मुद्दा कसा सोडवता येईल, यावर मी योग्य वेळी तपशीलासह बोलणार, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले. मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण असा प्रश्न विचारणाऱ्या राज ठाकरे यांचा बोलविता धनी कोण, असा सवालही त्यांनी केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.