devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: फडणवीसांचा जरांगेंशी फोनवरुन संवाद, दिला चर्चेचा प्रस्ताव; CM शिंदेही संवाद साधणार

आज मराठा आरक्षणविषयक कॅबिनेटच्या उपसमितीची बैठक पार पडणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोर जरांगे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला, तसेच त्यांना चर्चेचा प्रस्तावही दिला. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील लवकरच आंदोलकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. (Marath Reservation Devendra Fadnavis talks with Manoj Jarange CM Ekanth Shinde will also interact)

एएनआयच्या माहितीनुसार, भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं होतं की त्यांनी या प्रकरणावर चर्चा करावी. त्यामुळं फडणवसांच्या संवादानंतर लवकरच मुख्यमंत्री देखील आंदोलकांची भेट घेऊन चर्चा करतील, असं सांगितलं जात आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, फडणवीसांनी जरांगे यांना जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणात न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर लवकरच मराठा आंदोलनाच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येईल, असंही सरकारनं म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

यापार्श्वभूमीवर आज दुपारी मराठा आरक्षणविषयक कॅबिनेटच्या उपसमितीची बैठक पार पडणार असून यामध्ये आरक्षणासंबंधी चर्चा होईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

IND vs NZ 2nd Test : ७ बाद १०३ धावा! Yashasvi Jaiswal ने इतिहास रचला, पण विराटसह इतरांनी पार केला कचरा

भारत स्वातंत्र्यानंतर मुंबई इलाख्यात कोल्हापूर अन् पहिल्या आमदारांपैकी बाबासाहेब खंजिरेंनाच मिळाली पुन्हा संधी!

IND vs NZ: काल अ‍ॅक्टींग करत मैदान गाजवले, आज ९व्या चेंडूवर त्रिफळे उडाले! Virat Kohli चे दोन भिन्न Video

SCROLL FOR NEXT