chandrakant patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: नव्यानं गोळा करणार इम्पिरिकल डेटा; मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

तसेच ज्यांच्या कुणबी असल्याच्या जुन्या नोंदी आढळून आल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग नव्यानं इम्पिरिकल डेटा गोळा करणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

तसेच न्या. संदीप शिंदे यांच्या समितीचा अहवालही सरकारनं स्विकारला. बैठकीनंतर मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. (Maratha Reservation Empirical data to be collected anew a big decision taken in Cabinet meeting)

जुन्या नोंदी शोधून मराठा समाजाला कुणबी दाखला देता येईल का? यासाठी न्या. शिंदे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालात ११ हजार ५३० नोंदी आढळून आल्या आहेत. याचा अहवाल उपसमितीत स्थापन झाल्यानंतर तो आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

यानुसार, ज्यांच्या नोंदी आढळल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, यासाठी मार्गदर्शक सूचना काढण्यात येतील असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

न्या. शिंदे यांचा अहवाल हा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये अनेक नोंदी या उर्दुमध्ये असून त्याचं भाषांतर मराठीत करणं गरजेचं असल्यानं या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही माहिती सार्वजनिक करण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत, असंही यावेळी पाटील यांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, फडणवीस सरकारनं मराठा आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयात टिकलं. मात्र, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. यात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे, यावर सुनावणी घेण्याचं सुप्रीम कोर्टानं मान्य केलं आहे, असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT