Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : 'सगेसोयरे' अधिसूचनेविरोधात पहिली याचिका दाखल; मुंबई हायकोर्टात 'यांनी' घेतली धाव

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात ओबीसी संघटनांकडून आव्हान देण्यात आलेलं आहे. 'सागेसोयरे' व 'गणगोत' यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारी च्या (GR) मसुद्याला ओबीसी संघटनेचे कोर्टात आव्हान दिले आहे.

ओबीसी वेल्फेयर फाऊंडेशन तर्फे ऍड मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्चं न्यायालयात याचिका दाखल केली. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत, त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाने २६ जानेवारी रोजी अधिसूचना काढून सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं नोटिफिकेशन काढलं असून १६ फेब्रुवारीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयाला ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी संघटनांनी विरोध केला होता. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी मंगळवारी इशारा दिला. 'जर ते सगेसोयऱ्यांच्या बाबतीत कोर्टात गेले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करेन' असं जरांगे म्हणालेत. त्यामुळे आता दोन्ही गटाकडून न्यायालयीन लढाया लढल्या जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS W vs SA W: गतविजेता ऑस्ट्रेलिया 15 सामन्यानंतर मोक्याच्या क्षणी हरला; दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला

Hamas Chief Death: हमास प्रमुख याह्या सिनवर इस्राईल लष्कराच्या हल्ल्यात ठार; पंतप्रधान नेत्यानाहूंची घोषणा

Baba Siddiqui Case: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आरोपी शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तरच्या विरोधात लुक आउट सर्कुलर जारी

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT