Vijay Wadettiwar esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा समाजाची ओबीसी वंशावळ सिद्ध होत असेल तर...; वडेट्टीवारांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चघळत चालला आहे. यावर दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. तर मराठा समाजाकडून ओबीसीमध्ये समावेशासाठी आग्रह धरला जात आहे. त्यावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, उद्याच्या ओबीसीच्या आंदोलनात मी सहभागी होणार आहे. सत्ताधारी भाजप हे मराठा-ओबीसी यांच्यात वाद लावत आहे. मराठा समाजाची ओबीसी वंशावळ सिद्ध होत असेल तर समस्या नाही. मात्र, त्यापलीकडे जावून काही झालं तर त्याला आमचा विरोध असेल. ओबीसीच्या वाट्यातून आरक्षण देऊ नये. आरक्षणाची मर्यादा 50 टक्के वर करा, असही वडेट्टीवार यांनी म्हटलं.

दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकारला ओबीसींची मते पाहिजे. पण ओबीसीसाठी काहीही करायचं नाही. जातनिहाय जनगणना का करत नाहीत, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. सरकारला ओबीसीला न्याय द्यायचाच नाही. ओबीसींना काही द्यायचच असेल तर जनगणना घ्या, असं आव्हान वडेट्टीवारांनी सरकारला दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: संविधान नसतं तर..? राहुल गांधींनी फुले आंबेडकरांची आठवण काढत केली RSS वर टीका

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

SCROLL FOR NEXT