Manoj jarange  sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ; मंत्री शंभुराज देसाईंची माहिती, 'अशी' असेल सुरक्षा व्यवस्था...

संतोष कानडे

Maratha Reservation : मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व सांभाळणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी गावात रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी झाली होती. मनोज जरांगे पाटील यांचं घर आणि उपोषणस्थळाच्या भोवती ड्रोन कॅमेऱ्याने पाळत ठेवल्याचा संशय होता. त्यानंतर मराठा समाजाने आक्रमक होत मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली होती.

बुधवार, दि. ३ जुलै रोजी जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथील ते राहतात त्या निवासस्थानी आणि आंदोलनाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही अज्ञात ड्रोनद्वारे टेहळणी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून त्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी होत होती.

मनोज जरांगे पाटलांना सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पाटलांसोबत आता चार शस्त्रधारी पोलिस आणि एक पोलिस व्हॅन तैनात असेल. मंत्री शंभुराज देसाई यांनी ही माहिती दिली.

शंभूराज देसाई म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी अंतरवाली सराटी इथला मुद्दा मांडला होता. याबाबत पोलिस अधीक्षकांनी अहवाल दिला आहे. त्यानुसार, रात्रीचं ड्रोन सर्वेक्षण झालं होतं, त्याची तीन पथकांमार्फत चौकशी करण्यात आलीय. त्यामुळेच जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यांच्यासोबत चार पोलीस आणि एक पोलीस वाहन सुरक्षेसाठी तैनात असेल, अशी माहिती देसाईंनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Thane: मविआला संधी मिळाल्यास सर्वात आधी शिंदेंवर राग काढणार अन्...; मोदींचा ठाण्यातून घणाघात

Sitaram Dalvi Passed Away: बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ सहकाऱ्याचं निधन! राज ठाकरेंनी केली पोस्ट

IND vs BAN 1st T2OI : संजू सॅमसन ओपनिंगला, मयांक किंवा हर्षित यांचे पदार्पण? पहिल्या सामन्यासाठी भारताची संभाव्य Playing XI

Gunaratna Sadavarte Death Threat : बिग बॉसच्या घरात जाण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी!

Stock Market: चीनच्या शेअर बाजारात विक्रमी वाढ! सध्या कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे फायद्याचे?

SCROLL FOR NEXT