Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : जालना लाठीहल्ला प्रकरणी मोठी अपडेट! हायकोर्टात जनहित याचिका दाखल

सकाळ डिजिटल टीम

छत्रपीत संभाजी नगरः जालन्यातल्या आंतरवाली येथे शुक्रवार, दि. १ सप्टेंबर रोजी पोलिस आणि आंदोलकांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी अमानुषपणे आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध झाला. आता या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं 1 सप्टेंबर रोजी साधारण 1500 पोलिस आणि एसआरपीएफ जवानांनी आंदोलनकर्त्यांना अमानुषपणे मारहाण केली होती. आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केलेली होती. या प्रकरणी आता अ‍ॅड. देविदास आर. शेळके यांनी ‘पार्टी इन पर्सन’ ही फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ही घटना घडली त्या दिवशी आंदोलन उधळून लावण्यासासाठी आंदोलकांवर अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. गोळीबारदेखील करण्यात आला होता.

त्या दिवशी अनेक आंदोलकांना पोलिसांनी घरात घुसून मारल्याचा प्रकार घडला. यामध्ये शंभरपेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले असून काहींवर अद्यापही उपचार सुरु आहेत. घटनेची आपबिती याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. पोलिसांच्या कारवाईला विरोध म्हणून आणि जीव वाचवण्यासाठी काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात दहा-बारा पोलिस जखमी झाले, असं याचिकेत म्हटलं आहे.

या प्रकारानंतर पोलिसांनी 700 पेक्षा अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत. ज्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने हा हल्ला झाला त्यांच्यावर मात्र काहीही कारवाई करण्यात आली नाही. या मारहाण प्रकरणी जे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी होते; त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत आणि या संपूर्ण प्रकरणाची तटस्थ आणि पारदर्शीपणे न्यायालयीन समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Shri Thanedar: ट्रम्प लाट असूनही मराठमोळ्या नेत्याने उधळला विजयाचा गुलाल! दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे खासदार, कोण आहेत श्री ठाणेदार ?

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

USA Election 2024: राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस

Latest Marathi News Updates live: मविआकडून बीकेसीच्या सभेत पंचसुत्री जाहीर

SCROLL FOR NEXT