मुंबईः संविधानदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवाजी पार्क इथं संविधान सन्मान सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या सभेमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांना एक सल्ला दिला होता. त्याच्यावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, मनोज जरांगे पाटलांनी कुणाचाही सल्ला घेऊ नये. त्यावर जरांगे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला मला मान्य आहे. त्यांच्याविषयी आमच्या मनात चांगल्या भावना आहेत. परंतु मला कुणीही सल्लागार नाहीये.
जरांगे पुढे म्हणाले, मी कधीच जातीवाद करत नाही. माझ्या त्या विधानाचा गैरअर्थ काढला गेला. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला पाठबळ दिलं आहे. एकदा पाठबळ दिल्यानंतर ते कधीच मागे सरकत नाहीत आणि दिलेला शब्द फिरवत नाहीत. त्यामुळे त्यांचा सल्ला मला मान्य आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेत्यांना इशारा देत त्यांनी आपल्या नादी लागू नगे. ओबीसी आरक्षणावेळी ते मंडलसोबत होते की कमंडलसोबत होते, हे मला माहिती आहे, असं म्हटलं.
बीडमधील घटनेवर बोलताना ते म्हणाले, बीडमध्ये प्रोफेशनल लोकांकडून जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी कसून तपासणी केली पाहिजे.
दुसरीकडे रविवारी हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलिला मैदानावर ओबीसींचा दुसरा मेळावा होत आहे. पहिल्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी आक्रमक भाषण केल्याने ओबीसी नेत्यांनीच नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज भुजबळ काय बोलतात, याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.