Chandrakant Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ''सरकार लवकरच 'सगेसोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी करणार'' चंद्रकांत पाटलांचा शब्द...

संतोष कानडे

Chandrakant Patil News : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूरमध्ये बोलताना सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीबाबत खात्रीशीर विधान केलं आहे. राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा वाद पेटलेला आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांनी त्यासाठी सरकारला १३ जुलैपर्यंतचा वेळ दिलेला आहे.

दरम्यान, पंढरपूमध्ये बोलताना कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार लवकरच सरकार सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणार आहे. मात्र यामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. ओबीसींना धक्का न लावता अधिसूचना काढली जाईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी पंढरपुरात दिली.

राज्यामध्ये एकीकडे ओबीसी समाज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे तर दुसरीकडे मराठा समाज ओबीसींमधून आरक्षण मागत आहे. यापूर्वीच राज्यातील मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहे. मात्र इतर मोठ्या घटकाचा आरक्षणात समावेश करण्यासाठी सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम शेतकरी योजनेचा अठरावा हप्ता मिळण्यास सुरुवात; 2000 खात्यात आले का? लगेच चेक करा

"यांच्यात नक्की काय शिजतंय ?" अंकुश -भाग्यश्रीचे फोटो झाले व्हायरल , कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाची चर्चा

Kolhapur: नेता असावा तर असा! कुठल्याही हॉटेलला न जाता राहुल गांधींनी गाठलं थेट टेम्पोचालकाचं कौलारू घर; कोणाची घेतली भेट?

Pune Crime: बोपदेव घाट बलात्कार प्रकरण, संशयित आरोपींचे CCTV फुटेज समोर; पाहा VIDEO

Latest Marathi News Live Updates: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असणारे नितेश राणे आता संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

SCROLL FOR NEXT