नेवासा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आज त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा इथं सभा पार पडली. या सभेत त्यांनी पुन्हा मंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट केलं. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांना मराठ्यांविरोधात बोलणं टाळण्याबाबत तंबी द्यावी, अन्यथा सरकारला जड जाईल, असा इशारा देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही इशारा दिला आहे. (Maratha Reservation Manoj Jarange jibe at Chchagan Bhujbal and Ajit Pawar)
बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही
आरक्षणाची लढाई आपल्याला अशीच लावून धरायची आहे. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. आरक्षणासाठी मराठा बांधवांनी दिलेलं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. ७० वर्षे मराठा नोंदी लपवून ठेवल्या गेल्या. आता नोंदी सापडल्या, मग इतकी वर्षे आरक्षण का दिलं नाही? असा सवाल यावेळी जरांगे यांनी केला. (Latest Marathi News)
टोळ्या निर्माण करुन मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न
आत्तापर्यंत आरक्षणाच्या लढाईत विजय जवळ आला की राजकीय नेते षडयंत्र करून ती लढाई यशस्वी होऊ देत नव्हते. पण आता आगामी हिवाळी अधिवेशन कालावधी वाढवण्यात आला आहे. बहुतेक मराठ्यांच्या आरक्षणासाठी तारीख वाढवली असेल. विजयाचा क्षण जवळ आलाय, गाफील राहू नका, अशी संधी पुन्हा मिळणार नाही. ही लढाई गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. (Marathi Tajya Batmya)
आरक्षण न मिळाल्यामुळं मराठयांचा नोकरीतील टक्का कमी झाला. इतर कुणाला आरक्षण द्यायचं झालं तर विरोध होत नाही. पण मराठ्यांना आरक्षण द्यायचा विषय आला की विरोध सुरू होतो. आज मराठे एक झालेत, मराठ्यांची अशी लाट आलीय की कुणालाच काही सुचेना. सर्व मराठे एकत्र आलेत, टोळ्या निर्माण करून मराठ्यांना चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही जरांगे यावेळी म्हणाले.
एकदा आरक्षण मिळू द्या मग...
भुजबळांवर निशाणा साधताना जरांगे म्हणाले, "एकदा आपल्या पदरात आरक्षण मिळू द्या, मग याच्याकडे पाहू. त्याला काय करायचं आहे, ते करू द्या. बोर्ड फाडायचे फाडू द्या, तुम्ही शांत राहा. मी कधीही अपमान सहन करत नाही, पण आरक्षणासाठी गप्प बसलोय. अपमान पचवला आहे, नाहीतर टप्प्यात आला की कार्यक्रम केलाच. या माणसाच्या लक्षात आलंय, मराठे आता आरक्षणात आले, म्हणून दंगली घडवण्याचा याचा प्रयत्न आहे. (Latest Marathi News)
अजित पवारांना दिला इशारा
आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा. मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की याला शांत बसवा, रोखा. त्यानं बोलायचं बंद करावं, आम्हीही बोलणार नाही. अजितदादांनी यामध्ये लक्ष घालावं, माझ्या जातीच्या पोरांना त्रास व्हायला लागला आहे. आम्ही आता सज्ज झालोय. तुम्ही याला रोखा, नुसती तंबी देऊ नका. एका बाजूने तुम्ही म्हणता आम्ही तंबी दिली आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा सुरू होणार. याचा अर्थ याला तुमचंच पाठबळ आहे. नाहीतर हे सगळं सरकारला जड जाऊ शकतं, अशी शब्दांत यावेळी जरांगेंनी अजित पवारांनाही घेरलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.