महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: पृथ्वीराज चव्हाण जरांगे पाटलांना भेटले, ओबीसी नेत्याचा तिळपापड; मुख्यमंत्र्यांवरही जोरदार हल्ला

Laxman Hake: यातला एकही आजी-माजी मुख्यमंत्री ओबीसी आरक्षणावर चकारही बोलायला तयार नाही. यांना फक्त जरांगेंच्या मतांची काळजी आहे.. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य समाजाची कसलीही काळजी त्यांना नाही. हे सगळे आजी-माजी मुख्यमंत्री सगळे पक्ष सोडून एक झाले आहेत.

संतोष कानडे

Maratha Reservation: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये चर्चा झाली.

या भेटीनंतर ओबीसी आरक्षण लढ्याचे नेते लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे यांना जाऊन भेटले. अशोक चव्हाण हेही दोन-तीन वेळा जाऊन भेटले.. शरद पवार हेही भेटले.

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर जरांगेंना रेड कार्रपेटच टाकतात. या तीन-चार मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील वंचित, शोषित पीडित आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गाचं थोडंही सोयरंसुतक नाही का? असा प्रश्न लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला.

हाके पुढे म्हणाले, यातला एकही आजी-माजी मुख्यमंत्री ओबीसी आरक्षणावर चकारही बोलायला तयार नाही. यांना फक्त जरांगेंच्या मतांची काळजी आहे.. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य समाजाची कसलीही काळजी त्यांना नाही. हे सगळे आजी-माजी मुख्यमंत्री सगळे पक्ष सोडून एक झाले आहेत.

''ओबीसी समाजाने फक्त हुजरे घालत बसायचं आहे का? आपला पक्ष आणि आमदार कसे निवडून आणायचे, याचंच त्यांना पडलंय.'' असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी लढा तीव्र करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळात आम्ही मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांना कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकवता आलेलं नाही. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कुठल्याही पदासाठी नसून निःस्वार्थी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय दरेकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT