Modi_Jarange 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: "PM मोदींना गरिबांच्या प्रश्नांची जाण राहिलेली नाही"; जरांगे आता केंद्र सरकारला आणणार जेरीस!

मराठा आरक्षणासाठी जरांगे आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

जालना : मराठा आरक्षणविषयी चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर आज जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावातून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं आहे.

मोदींना आता गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण राहिलेली नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. (Maratha Reservation Manoj Jarange now targated PM Narendra Modi ask some questions)

मोदींना विनंती केली पण...

माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना जरांगे म्हणाले, "जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या विषयासाठी दिल्लीला गेले असतील तर चांगलीच गोष्ट आहे. मी पंतप्रधान मोदींना पाच-सात दिवसांपासून विनंती करतो आहे की, आपल्याला गोरगरिबांची जाणीव आहे. (Latest Marathi News)

आपण गरिबीतून आला आहात, त्यामुळं त्यांच्या वेदना आपल्याला कळू शकतात. मराठ्यांना शासन निर्णय करुन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करुन घ्या, असा फोन किंवा संदेश आपण तातडीनं महाराष्ट्र सरकारला द्यावा. तुम्ही सांगितलं तर दोन तासांत मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं.

मोदींना आता गरिबांची गरज राहिली नाही

पण आजपर्यंत पंतप्रधान मोदींनी या मागणीवर कार्यवाही केलेली नाही असं दिसतंय. बहुतेक आता त्यांना गोरगरिबांची गरज राहिलेली नाही. गोरगरिबांच्या प्रश्नांची जाणही त्यांना राहिली नसावी अशी आम्हाला शंका यायला लागली आहे. पण ठीक आहे त्यांचा प्रश्न त्यांच्याजवळ कारण त्यांना आता गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे नसतील बहुतेक. पण आम्ही लढायला सज्ज झालो आहोत. (Marathi Tajya Batmya)

तर त्यांना आम्ही ताळ्यावर आणणार

शांततेत हे आंदोलन राज्यभर सुरु राहिल. राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा करोडोंच्या संख्येत यात उतरला आहे. आम्ही आरक्षण मिळवूच त्याशिवाय आम्ही मागं हटत नाही. शिंदे-फडणवीस दिल्लीला गेल्याचं आपल्याला माहिती नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. यावर बोलताना जरांगे म्हणाले, "जर सरकारमधील नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाबाबत ताळमेळ नसेल तर त्यांना आम्ही ताळ्यावर आणणार आहोत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT