Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: "ज्यांनी गोळ्या झाडल्या ते मुंबईत शिष्टमंडळासोबत फिरतायत", जरांगेंनी व्यक्त केला संताप

Sandip Kapde

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात आंतपवली सराटी येथे गेल्या १२ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषण करत आहेत. १ सप्टेंबरला या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर या आंदोलनाचा विस्तार वाढला. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकार मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करत आहेत.

दरम्यान याप्रकरणी सरकारची तिसरी फेरी अपयशी ठरली आहेत. ७ सप्टेंबरला सरकारने आरक्षणासंदर्भात जीआर काढला होता. मात्र त्यातील वंशवाळीचा मुद्दा हटवावा आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. यासंदर्भात काल (शुक्रवार) मुंबईत मिटींग झाली. नवीन जीआर काढण्यात आला मात्र या जीआर मध्ये दुरुस्ती झाली नसल्याने उपोषण सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. (Maratha Reservation Latest News)

मनोज जरांगे यांनी आज बोलताना सरकारवर संताप व्यक्त केला. सरकराने चर्चेनुसार जीआरमध्ये दुरुस्ती केली नाही. ७ सप्टेंबरला काढलेच्या जीआरमध्ये वंशावाळ शब्द काढून सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, ही आमची मागणी होती, असं ठरलं देखील होत. मात्र बदल केला नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे पाटील म्हणाले, "२००४ चा मराठा-कुणबी तो जीआर काम करत नव्हता. १९ वर्ष झाले त्या जीआरचा एकही उपयोग झाला नाही. त्यात देखील दुरुस्त्या अपेक्षीत होत्या. मात्र त्यात झाल्या नाहीत. या जीआरमध्ये दुरुस्ती करुन मराठा समाजाला तात्काळ सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे". (Latest Marathi News)

"आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही मार खाल्ला. आताही आमच्या माय माऊली आयसीयूमध्ये आहेत. त्यांच्या छातीत १३ छर्रे आहेत. गंभीर गुन्हे दाखल आहेत. सरकार गुन्हे मागे घेतो म्हटले पण प्रक्रिया आतापर्यंत सुरु झाली नाही. जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई तातडीने करायला हवी पण त्यांना सक्तेच्या रजेवर भजी खायला पाठवले.
बडतर्फीची एकही कारवाई झाली नाही," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "ज्यांनी गोळ्या फायर केल्या ते मुंबईला शिष्टमंडळासोबत फिरत आहेत. ज्यांच्या चौकशा व्हायला पाहिजे ते अधिकारी आपल्या समोर फिरत आहेत. तातडीने कारवाई होणार म्हटले होते मात्र आतापर्यंत एकही कारवाई झाली नाही. भ्याड अमानुष हल्ला करणाऱ्याला सक्तेच्या रजेवर पाठवत नसतात."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

Share Market Today: शेअर बाजार नव्या उच्चांकासाठी सज्ज; कोणते शेअर्स असतील तेजीत?

Tirupati Laddu Recipe: घरीच बनवा खास तिरूपती लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

SCROLL FOR NEXT