manoj jarange maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : ''आम्ही चारही बाजूंनी तयारी केलीय, आता...'' मनोज जरांगेंनी सरकारला काय इशारा दिला?

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २० तारखेच्या मुंबईतल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत सरकारला इशारादेखील दिला आहे.

संतोष कानडे

अंतरवाली सराटीः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २० तारखेच्या मुंबईतल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत सरकारला इशारादेखील दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे की, कुणीही घरी रहायचं नाही. लेकरांना मोठं करण्यासाठीचं हे शेवटचं आंदोलन आहे. कुणाचं वाहन अडवलं जाणार नाही, कुणालाही भिण्याची गरज नाही.

मराठा बांधवांनी तालुक्यात, गावात बैठक घ्यायला सुरु करा. आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सगळ्या ताकदीनीशी मराठा तयार आहे. सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणार नाही. सरकारने आंतरवालीचा प्रयोग पुन्हा करण्याचं स्वप्न बघू नये. मराठे शांततेत येत आहेत, त्यांना शांततेत आंदोलन करु द्या.

जरांगेंनी इशारा दिला की, सरकारने जरी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही चारही बाजूने तयारी केली आहे. त्यांनाही मुंबईत घुसल्यावर कळेल, आमची तयारी कशी आहे ती. सुरुवातीला कमी लोक दिसतील. नंतर मात्र कोट्यवधी लोक मुंबईत असतील.

''मराठा समाज ओबीसींमध्ये असतानाही आरक्षण दिलं जात नाहीये. कायद्याच्या चौकटीत असणारे सगळे निकष पार केले असले तरी आम्हाला आरक्षणापासून दूर ठेवलं जात आहे, हे चुकीचं आहे. त्यांनी जर आम्हाला डिझेल घेऊ दिलं नाही, गॅस घेऊ दिला नाही तर आम्हीही त्यांचं दूध, भाजी बंद करणार आहोत.. भविष्यात दाळी, धान्य सगळं बंद करणार आहोत. आम्ही डिझेलविना गाड्या चालवू आणि गॅसविना लाकडं पेटवू'' असं जरांगे म्हणाले.

ते पुढे बोलले की, सरकारने मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण याचे दूरगामी परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. मुळात त्यापूर्वीच सरकारने आरक्षणाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. सरकारने कसलाही दगाफटका करण्याचा विचार करु नये, आम्ही सर्व बाजूंनी तयारी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

MNS Candidates List: मनसेची सहावी यादी जाहीर, ३२ उमेदवारांची नावे, कुणाला मिळाली संधी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

Assembly Elections: उमेदवारी अर्जासाठी 2 दिवस शिल्लक, जाणून घ्या आतापर्यंत महायुती-मविआने किती उमेदवार जाहीर केलेत?

SCROLL FOR NEXT