Sharad pawar_Namdevrao Jadhav 
महाराष्ट्र बातम्या

Namdeorao Jadhav: "...तर 16 टक्के आरक्षण आम्हाला तेव्हाचं मिळालं असतं"; नामदेवराव जाधवांचा शरद पवारांवर निशाणा

मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण तणावपूर्ण आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण तंग आहे. यापार्श्वभूमीवर जिजाऊंचे वंशज आणि मोटिवेशनल स्पीकर असलेले नामदेवराव जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन काही गणितं मांडली आहेत. तसेच राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maratha Reservation Namdevrao Jadhav targets Sharad Pawar)

जिजाऊंचे वंशजांनी मांडली भूमिका

नामदेवराव जाधव हे सोशल मीडियावरुन विविष विषयावर सातत्यानं आपली भूमिका मांडत असतात. सध्या मराठा आरक्षणावरही त्यांनी भाष्य केलं आहे. काही तासांपूर्वी त्यांनी केलेल्या पोस्टमधून थेट शरद पवार यांना टार्गेट केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

ते म्हणतात, "आम्ही जे बोलतो ते आमचा अभ्यास पणाला लावून आणि जे वास्तव तेच बोलतो. आमच्या पाच कोटी मराठा बांधवांच्या जगण्या मरण्याचाहा गंभीर प्रश्न आहे. जर आम्ही बोलणार नाही तर मग कोण बोलणार होतं. लाचार गुलाम आश्रित लोक कधी अशी भूमिका घेऊ शकत नाहीत, म्हणून मलाच हे बोलावं लागलं. आमचं 16 टक्के आम्हाला त्याचवेळी मिळालं असतं तर आज मराठा समाजाच्या दोन पिढ्या बरबाद झाल्या नसत्या. 23 मार्च 1994 हा काळा दिवस होता कारण मुख्यमंत्री आपलेच होते अशी आपली भाबडी समजूत होती"

शरद पवारांवर साधला निशाणा

जाधव यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी २३ मार्च १९९४ या तारखेचा उल्लेख केला आहे. या काळात शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच याच दिवशी महाराष्ट्र शासनानं काढलेला एका जीआरची कॉपी त्यांनी पोस्ट केली आहे. मंडल आयोगानं केलेल्य शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय, निमशासकीय सेवेत आरक्षण देण्यासंबंधीचा हा जीआर आहे.

यामध्ये म्हटलंय की, मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार, ओबीसींच्या आरक्षणात १० टक्क्यांवरुन १९ टक्क्यांवर अर्थात ९ टक्के वाढ तसेच विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांच्या आरक्षणात एकूण तीन टक्के वाढ करण्यात आली होती. अनुसुचित जाती-जमातींचं आरक्षण वगळता इतरांच्या आरक्षणाची मर्यादा ३० टक्के झाली होती. (Latest Marathi News)

...तर १६ टक्के आरक्षण मिळालं असतं

पण याचवेळी जर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठा समाजाचाही विचार केला असता तर त्याचवेळी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळालं असतं, असा दावा नामदेवराव जाधव यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansabha Election 2024: "पुतण्याला पुढे करून काकांनी मिळवली उमेदवारी," सोशल मीडियावर नेमकी कुठल्या चुलत्याची चर्चा?

मोठी बातमी! बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारी तर दहावीची 21 फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा; प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा कधी? वाचा...

Pune: मोठी बातमी, पुण्यात पकडली लाखोंची रोकड! मालक नक्की कोण?

Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसमध्ये थोरातांच्या नावाची चर्चा

Maharashtra Assembly Elections 2024: ‘इलेक्शन ड्यूटी’ नाकारल्यास जावू शकते नोकरी

SCROLL FOR NEXT