Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: "ओबीसी आरक्षणाला हात लावू देणार नाही म्हणता, मग आज शांत का?"; शेंडगेंचा अजितदादांना सवाल

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना अजित पवारांनी अद्याप त्यावर समाधानकारक भूमिका मांडलेली नाही.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. यासाठी जालना इथं मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केलं आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे दाखले देऊन त्यांना ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी ते अडून बसले आहेत. पण त्यांच्या या मागणीला ओबीसीनं कडाडून विरोध दर्शवला आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, अशी भूमिका पूर्वी अजित पवारांनी मांडली होती. मग ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असताना ते गप्प का आहेत? असा सवाल ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. (Latest Marathi News)

शेंडगे म्हणाले, "काल रात्री उशिरापर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी म्हणून सरसकट प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. या चर्चेनंतर आज उपोषणकर्ते जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. यावर शेंडगे यांनी ओबीसींची भूमिका पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली.

रात्री-अपरात्री जीआर कसे निघतात?

सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय आहे. रात्री अडीच वाजता सरकारनं जीआर काढल्याचं समजल. मात्र, हा जीआर अद्याप आम्हाला मिळालेला नाही. कुणबी समाजाचा विरोध मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात नाही तर ओबीसीमधून आरक्षण देण्याला विरोध आहे. (Marathi Tajya Batmya)

याआधी जेव्हा आरक्षणाची मागणी लावून धरली तेव्हा फडणवीसांनी काहीही झालं तरी ओबीसींमध्ये कोणाला वाटेकरू होऊ देणार नाही. तसेच ओबीसी आरक्षणाला कणभर हात लाऊ देणार नाही, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. मात्र, आता रात्री बेरात्री जीआर निघत आहेत, असंही शेंडगे यांनी म्हटलं आहे.

सरकारचा निर्णय अमान्य

आम्हाला सरकारचा निर्णय मान्य नाही. शेवटी लाठीनं जर न्याय मिळणार असेल ही लाठी आम्हाला सरककारविरोधात उगारावी लागेल. मराठा समाजाविरोधात आम्ही बोलत नाही. पण जर सरकारनं आम्हाला भाग पाडलं तर त्यांच्याविरोधात आम्हाला अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागेल. (Marathi Tajya Batmya)

समित्या नेमून गोलमाल करु नका

माझी पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे. आता सरकारनं समिती नेमली आहे, गेल्यावेळी देखील सरकारनं भोसले समिती नेमली होती. ते निवृत्त हायकोर्टाचे न्यायाधीश होते. त्यांनी काही शिफारशी केल्या, त्यांचं काय झालं? आता पुन्हा दुसरी समिती नेमली आहे. अशा समित्या नेमून मराठा समाजाला गोलमाल करायचा जो सरकारचा प्रयत्न आहे.

मराठा समाजानं EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा

मराठा समाजाला स्वच्छ आरक्षण हवं असेल तर सध्या केंद्रानं त्यांना EWSचं १० टक्के आरक्षण आहे. हे आरक्षण घटनादुरुस्ती करुन दिलेलं आहे. सध्या गरीब मराठ्यांची मुलं त्याचा लाभ घेत आहेत. जर ही टक्केवारी त्यांना कमी पडत असेल तर ती वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करावं. त्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रातील ओबीसी समाज उभा राहिलं.

५८ मोर्चांचा उद्देश पूर्ण वेगळ्या आरक्षणाचा होता

जरांगेंना देखील माझी विनंती आहे की, गरीब मराठा लेकरांनी काय करायचं? तर त्यासाठी संविधानिक मार्ग असा आहे की, त्यांच्यासाठी EWS चं आरक्षण आहे. जे ५८ मोर्चे निघाले होते की आम्हाला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही, आम्हाला वेगळं आरक्षण हवं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT