gunaratna sadavarte and nana patole sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकील सदावर्तेचा बोलविता धनी कोण?

राज्यात मराठा आरक्षणाची धग कायम असतांना गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त विधान केले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाची धग कायम असतांना गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त विधान केले जात आहे. त्यामूळे काँग्रेसचे प्रदेशाध्य़क्ष नाना पटोले यांनी सदावर्तेंवर सडकून टिका केली आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणारे सदावर्तेंचा बोलविता धनी कोण असा प्रश्नच पटोले यांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षण प्रश्नावर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन समाजाची फसवणूक करत आहे. तर दुसरीकडे सदावर्ते मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही. त्यासाठी वेळ पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार अशी जाहीर दर्पोक्ती सदावर्ते करत आहे. याआधीही सदावर्तेनी विविध मुद्द्यांवर भाजपाधार्जिणी भूमिका घेतली आहे. सदावर्ते हा फडणवीस यांनी दिलेली भूमिका मांडत असतो.

यावरून मराठा आरक्षणाला कोणाचा विरोध आहे आणि मराठा विरुद्ध ओबीसी वाद कोण उभा करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला असून, राहुल गांधी यांनी मांडलेली जातनिहाय जनगणनेची मागणी मान्य झाली तर आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो असेही सांगितले आहे.

मुंबईतील उद्योग गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात

महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे उद्योग मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. वेदांता-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. मुंबईतील हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT