मुंबई : राज्य मागावसवर्ग आयोगाच्या माध्यमातून सध्या राज्यात युद्धपातळीवर सर्व्हेक्षण केलं जात आहे. यापार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ओबीसी वेलफेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून मृणाल ढोले यांनी ही याचिका दाखल केली आहे. (Maratha Reservation petition in mumbai high court against commission of State Backward Classes Commission)
सदस्यांच्या नियुक्तीवर आक्षेप
या याचिकेमध्ये मागावसवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या मराठा समाजाच्या सर्व्हेला देखील यात आव्हान देण्यात आलं आहे. या सर्व्हेक्षणासाठी देण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्याची मागणी यातून करण्यात आली आहे. पण या याचिकेवर सुनावणी कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.