Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: हिशोबाची वेळ जवळ येत आहे; सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण न दिल्यामुळे ठाकरे गटाचा इशारा

Sandip Kapde

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदे सरकारने  बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदार आणि आमदारांना निमंत्रित केले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण आले आहे.

राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीला केवळ महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना बोलावण्यात आले.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली.त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही.

शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना निमंत्रण.एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले.पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते, असे संजय राऊत म्हणाले.

अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. पण आम्हाला मानपान नको.पण प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाची वेळ जवळ येत आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. (Maratha Latest News)

महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलकांनी राष्ट्रवादीचे दोन आमदार आणि एका माजी मंत्र्याच्या घरांना आग लावली. बीड, महाराष्ट्रामध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता आणि कलम 144 अन्वये लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनामुळे भाजप-शिंदे सरकार राजकीय कोंडीत अडकले आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : फुलेंचा पुतळा विचारांच्या मजबूत पायावर उभा; लोकार्पण सोहळ्यात भुजबळांकडून विचारसरणीवर ठाम असल्याचा निर्धार

Eknath Shinde: CM एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी! उच्च न्यायालयात याचिका, काय आहे प्रकरण?

Mumbai Crime: कोचिंग सेंटर चालवणाऱ्या 3 भावांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दक्षिण मुंबईतील प्रकार

Smartphone Buying Tips : ऑनलाइन सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? वापरलेला किंवा रीफर्बिश्ड मोबाईल ओळखण्याची सोपी ट्रिक,लगेच बघा

Shardiya Navratri Decoration Idea 2024: अंबाबाईचा उदो उदो..! नवरात्रीत पूजास्थळ सजवण्यासाठी 'या' वस्तूंचा करा वापर, लाभेल सुख-समृद्धी

SCROLL FOR NEXT