Laxman Hake on Manoj Jaraneg  esakal
महाराष्ट्र बातम्या

Laxman Hake: ''ज्यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांनी ओबीसींबाबत भूमिका स्पष्ट करावी''; 'या' नेत्यांची नावं घेऊन हाकेंचा थेट इशारा!

Laxman Hake on Manoj Jaraneg: लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि म्हटले की, आमच्या ताटातील मागासवर्गीयांचे तुम्हाला आरक्षण पाहिजे. एका बाजूला इतिहास सांगायचा आणि म्हणायचं एक मराठा लाख मराठा. तुम्ही एक कुणबी लाख कुणबी म्हणा.

Sandip Kapde

ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. समांतर आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या 4500 हजार नोकऱ्या गमावल्या आहेत. प्रस्थापितांनी आपल्या पाहुण्यांना मोठं केलं आहे.  काल प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, आम्ही 4500 हजार व्याज भरतोय. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 10000 कोटींची कर्ज दिले, हे कोणाच्या सांगण्यावरून दिले. ओबीसी बांधवांना एकही वसतिगृह मिळालेले नाही, असे हाके म्हणाले.  प्रवीण दरेकर, शरद पवार आणि मनोज जरांगेंवर लक्ष्मण हाके यांनी भाष्य केले.  

मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर प्रश्न

लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आणि म्हटले की, तुझं आणि ओबीसी च भांडण नाही, मग तुला ओबीसीमधूनच आरक्षण का पाहिजे? याचा कोण गुरू आहे, त्याला पारितोषिक दिलं पाहिजे. तसेच, त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आणि म्हटले की, पवारसाहेब तुम्ही आमच्या 18 पगड जातीचे अंतःकरण समजून घ्यायला पाहिजे होतं.

लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि म्हटले की, आमच्या ताटातील मागासवर्गीयांचे तुम्हाला आरक्षण पाहिजे. एका बाजूला इतिहास सांगायचा आणि म्हणायचं एक मराठा लाख मराठा. तुम्ही म्हणा की एक कुणबी लाख कुणबी.

आरक्षणाच्या लढ्याचे महत्त्व-

आमच्या एखाद्या बहिणीने जर उच्च वर्णीय लोकांसोबत लग्न केलं तर त्यांना देखील तुम्ही आरक्षण देणार आहात का? स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे पुन्हा एकदा जन्माला यावा लागेल. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव प्रोग्राम अजिबात नाही. अंतरवाली सराटीमधून म्हटलं जातं 60 वर्ष आमचं आरक्षण खाल्लं. ओबीसी आरक्षणामुळे आपले कारखाने किती झाले? आरक्षणामुळे किती आमदार झाले? यांचा गराजवंतांचा लढा नाही, आरक्षणाचा लढा नाही, यांची वर्चस्ववादाची लढाई आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर हाके यांनी टीका केली.

ओबीसी समाजाची मागणी-

लक्ष्मण हाके यांनी आवाहन केले की, आता फुले, शाहू, आंबेडकरांच्या सभागृहात 150 च्या वर ओबीसी बांधव गेले पाहिजेत. हे आरक्षण तुम्हाला आणि आम्हाला वाचवावे लागेल. आता लोकप्रतिनिधीना विचारावं लागेल, त्यांना विचारा तुम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, आम्हाला देणार का? कोण आहेत पंडित आणि कोण आहेत पवार? काय व्हायचं तर होऊद्या, हम जान हतेली पर लेके घुमते है.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT