पुणे - राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2017 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (मंगळवार) जाहीर झाला असून, यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात एकूण 89.50 टक्के निकाल लागला आहे.
आज दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. त्यासाठी पाच जूनपासून अर्ज भरण्यास सुरवात होईल. राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी निकाल यंदा 89.50 टक्के लागला आहे. यंदा 2.90 टक्क्यांनी निकाल वाढला आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 12,79, 406 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेला 15 लाख विद्यार्थी बसले होते. सर्वाधिक 95.20 टक्के निकाल कोकण या विभागाचा, तर सर्वांत कमी 88.21 टक्के निकाल मुंबई या विभागाचा लागला आहे.
परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिकेच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह बुधवार (ता. 31) पासून नऊ जूनपर्यंत विहीत शुल्क भरून अर्ज करता येईल. छायाप्रतीसाठी देखील बुधवारपासून 19 जूनपर्यंत अर्ज करता येईल.
उत्तरपत्रिकेचे फेरमूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. ती मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून शुल्क भरून विद्यार्थ्यांना विभागीय मंडळांकडे अर्ज करता येतील. फेरपरीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर नंतर जाहीर केले जाणार आहे, असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.
मुलांना धीर द्या!
बारावीचा निकाल लागला असून, यात अनुत्तीर्ण झाले, तरी विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाणार नाही. कारण जुलै महिन्यात लगेचच फेरपरीक्षा आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण झाले, तरी विद्यार्थी आणि पालकांनी ताण घेऊ नये. याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शरद आखेगावकर म्हणाले, 'निकालानंतर खरी भूमिका पालकांनी बजवावी. पाल्य अनुत्तीर्ण झाला, तरी आम्ही तुझ्याबरोबर आहोत, असा धीर त्याला द्यावा. पुन्हा प्रयत्न कर, त्यातून तुला जुलै महिन्यात यश मिळेलच, असा विश्वास द्यावा.''
उत्तीर्णांची संख्या :
मुली : 93.5%
मुले : 86.65%
विभागनिहाय निकाल :
पुणे : 91.16%
कोल्हापूर : 91.40%
कोकण : 95.20%
लातूर : 88.22%
मुंबई : 88.21%
औरंगाबाद : 89.83%
नागपूर : 89.05%
नाशिक : 88.22%
अमरावती : 89.12%
निकालासाठी संकेतस्थळे
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http://www.knowyourresult.com
www.rediff.com/exams
ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'मोरा' चक्रीवादळाची बांगलादेशला धडक
गायक अभिजितचे ट्विटर अकाऊंट पुन्हा 'सस्पेंड'
यूपीत मंत्र्यांकडून बारचे उद्घाटन; योगींनी मागितले स्पष्टीकरण
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी
लग्नानंतर फ्रीज, सोन्याची साखळी मागणाऱ्या पतीला अटक
हौसला बुलंद हो, तो क्या कॅन्सर, क्या दसवीं!
आपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा
शिवस्मारकाच्या टेंडरला वाढीव रकमेचे वळण!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.