शिरपूर ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांनी मुंबईतील विधान भवनात मंगळवारी विधान परिषद सदस्यत्वाची अर्थात आमदारकीची शपथ घेतली.
सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते शपथविधी झाला.
शपथविधीनंतर राज्यातील दिग्गज नेत्यांसह सभापती निंबाळकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, आमदार विजयकुमार गावित, आमदार काशिराम पावरा, आमदार राजेश पाडवी आदींनी आमदार पटेल यांचा सत्कार केला. विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघातील निवडणुकीत आमदार पटेल यांनी ४३७ पैकी ३३२ मतांनी विजय मिळविला. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससह विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत श्री. पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
त्यामुळे मतदारसंघातील जागा रिक्त झाली. त्याच जागेवर भाजपकडून श्री. पटेल निवडून आले. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. विकासाची दूरदृष्टी असलेले नेते म्हणून आमदार पटेल यांच्याकडे पाहिले जाते. ३५ वर्षांच्या वाटचालीत विधान परिषदेत निवडून जाण्याची त्यांनी हॅटट्रिक साधली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.