महाराष्ट्र बातम्या

Flood: गोदाकाठच्या शिवालयांना पुराचा वेढा, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

latest Flood News: इशारा गंगापूर तालुका प्रशासनाने दिला आहे. जुने कायगाव येथील प्राचीन शिवालय मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढलेले आहे.

सकाळ डिजिटल टीम

latest Rain news: नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील विविध धरणांतून विसर्ग करण्यात येत असलेल्या जुने कायगाव (ता.गंगापूर) येथील गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांच्या नागरिकांनी पूरस्थितीदरम्यान सुरक्षित स्थळी सतर्क राहावे, असा इशारा गंगापूर तालुका प्रशासनाने दिला आहे. जुने कायगाव येथील प्राचीन शिवालय मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढलेले आहे.

नाशिक व नगर विभागातून जायकवाडी धरणाकडे गोदावरी व प्रवरा नदीच्या मार्गाने पाणी दाखल होत आहे. गंगापूर तालुक्यातील

गोदावरी नदीच्या पूर काळात नदीकाठावरील मासेमारी करणारे, शेतकरी, नागरिक यांनी आपल्या मौल्यवान वस्तू, पशुधन, महत्त्वाची कागदपत्रे, अन्नधान्य संसारभांडे पूरस्थितीपासून उंच ठिकाणच्या सुरक्षित स्थळी राहावे. पुराच्या पाण्यात कोणीही उतरू नये, जुने कायगाव येथील गोदावरी नदीपुलावर वाहने उभी करून पूर पाणी पाहण्यासाठी, मोबाइलमध्ये सेल्फी काढण्यासाठी वाहने उभे करू नयेत, असे आवाहन तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी केले. तहसीलदार वगवाड यांनी आपती व्यवस्थापन विभाग आणि गोदावरी नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी राहण्यासंबंधी पत्र काढलेले आहे. त्या-त्या गावांतील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक, रेशन दुकानदार यांनी आपल्या गाव हद्दीतील लोकांना सावध राहण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्याचे निर्देशत केलेले आहे.

या गावांना पुराचा संभाव्य धोका

जायकवाडी प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेल्या गंगापूर तालुक्यातील नेवरगाव, हैबतपूर, अगरकानडगाव, ममदापूर, जामगाव, कायगाव, अमळनेर, लखमापूर, गळनिंब, भिवधानोरा, अगरवाडगाव, धनगरपट्टी, शंकरपूर, लक्ष्मीखेडा आदी गावांना नदी पुराचा संभाव्य धोका असतो. तर जायकवाडी धरण भरत आल्यावर शिवना नदीला उलटा पाण्याचा प्रवाह वाहतो. त्यामुळे पखोरा, सोलगाव, पुरी, ढोरेगाव, सय्यदपूर, पिंपळवाडी, पेंडापूर या शिवारातील नदीकाठच्या गावांना संभाव्य धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT