mask sakal
महाराष्ट्र बातम्या

पुन्हा मास्क घालावा लागणार, 'या' सार्वजनिक ठिकाणांचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील कोरोनाच्या केसेसमध्ये होणारी वाढ पाहता सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. अतिरिक्त मुख्य सचिव, डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचं आवाहन करण्यासंबंधीच्या आदेशांसह अन्य काही अन्य आदेश जारी केले आहे.

'रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याबद्दल सरकारने आवाहन केलं आहे. (Mask Compulsion in Maharashtra)

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्यास सांगितलं आहे.

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्यास सांगितलं आहे. सध्या नव्या व्हायरसची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने नव्याने निर्बंध लावणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये सार्वजनिक आणि बंद जागांचा समावेश आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लागणार नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

'वारंवार सूचना देऊनही राज्यातील चाचण्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. 1 जूनच्या आकडेवारीनुसार, 26 जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येत मोठी कमतरता आहे. ही चिंतेची बाब असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांचं प्रमाण तत्काळ वाढवावं', असं पत्रात म्हटलं आहे.

कुठे असणार मास्क सक्ती ?

मास्क सक्ती रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क घालावा.

केंद्राच्या पत्रानंतर राज्यात हालचालींना वेग

गेल्या दोन दिवसांपासून दररोज तीन हजारांच्यापुढे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, राज्यातील सहा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून या ठिकाणी टेस्टिंग,लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा असा सल्ला दिला आहे. केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवून वरील सूचना दिल्या आहेत. त्यानंतर व्यास यांनी स्थानिक आरोग्य अधिकारी आणि जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT