eknath shinde  sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: ..नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवणार काळे झेंडे; आदिवासी समाज आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde: निसर्गाची देणगी लाभलेल्या माथेरानच्या डोंगररांगेत असंख्य वाड्यावस्त्या वसलेल्या आहेत. येथे आदिवासी मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून आहेत. मात्र वाड्यावस्‍त्‍यांना योग्‍य रस्‍ते नसल्‍याने आदिवासींची जीणे मुश्‍किल झाले आहे.

येथील नागरी सोयीसुविधासाठी आदिवासी बांधवाना लढावे लागत आहे. त्‍यामुळे संतप्त आदिवासी बांधवांकडून आता आक्रमक पवित्रा घेतला जाणार आहे. कर्जत तालुक्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत. तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगण्यात आले. नुकतेच कर्जत तहसीलदार यांना या आशयाचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

जगाच्या नकाशावर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून अधोरेखित आहे. तर याच माथेरानच्या कुशीत बेकरेवाडी, आसलवाडी, नाण्याचामाळ, धनगरवाडा, बोरीचीवाडी, भुतीवलीवाडी, सागाचीवाडी, पाली धनगरवाडा, चिंचवाडी, आषाणेवाडी व किरवलीवाडीसह मोठ्या प्रमाणावर आदिवासी वाडयावस्त्या या स्वातंत्र्यपूर्व काळापासून वसलेल्या आहेत. या आदिवासी वाड्यावस्त्यांची वाट आजही बिकटच आहे.

शासन आदिवासींना आजवर पक्का रस्ता देऊ शकलेले नाही. त्यामुळे येथील रुग्णांना, गरोदर महिला यांना रुग्णालयात नेण्यासाठी झोळी करून न्यावे लागते. तसेच या भागातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात पाण्याच्या प्रचंड प्रवाहातून वाट काढावी लागते. त्यामुळे येथे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात येथील पायवाटांचा वापर करत घरी निघालेल्या आशाणेवाडी येथील एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची ताजी घटना आहे. तर बेकरेवाडी सह आजूबाजूच्या आदिवासी बांधवांनी श्रमदानातून केलेला हा रस्ता पावसाळ्यामुळे खाचखळग्यात हरवला आहे.

रस्ता व्हावा यासाठी दोन वेळा रास्ता रोकोसह उपोषण करून देखील आदिवासींच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत येथील आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ७ जानेवारी २०२४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्जत शहरातील लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवत निषेध करणार असल्याचे आदिवासी जनजागृती विकास संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी यांच्या कडून सांगण्यात आले आहे.

गेले अनेक वर्षे आम्ही रस्त्यासाठी लढा देत आहोत. मात्र शासन व लोकप्रतिनिधी यांनी आजवर दुर्लक्ष केले आहे. त्‍यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कर्जतमध्ये काळे झेंडे दाखवून आम्ही शासनाचा निषेध करणार आहोत.

-जैतू पारधी, अध्यक्ष, आदिवासी जनजागृती विकास संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli: ''मी कुणाच्या बापाला भीत नाही, बंटी पाटलांसारखं वागायला लागलो तर...'' बंडखोरीवरुन डिवचणाराला विश्वजीत कदमांनी भरसभेत झापलं

Jayanta Patil: " पोर्शे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहूयात", पाहा जयंत पाटलांनी काय केलं? Video Viral

Jhansi NICU Fire: हळहळ! सरकारी रुग्णालयात मोठी आग, 10 नवजात बालकांचा मृत्यू... 35 हून अधिक जणांची सुटका

Women In Games : महिलांमध्येही गेमिंगची क्रेझ....४४ टक्के प्रमाण; छोट्या शहरातही वाढत आहे टक्केवारी

Global Warming : बडी शहरे ‘हॉटस्पॉट’ शांघाय, टोकियोतून कार्बनचे सर्वाधिक उत्सर्जन

SCROLL FOR NEXT