महाराष्ट्र बातम्या

Mca election : विजयासाठी 'फिल्डींग', अजित पवार- फडणवीस यांची डिनर पे चर्चा

बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय बॅटिंग केली

मृणालिनी नानिवडेकर /सकाळ न्यूज नेटवर्क

MCA Election: बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर सर्वांचे लक्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या पॅनलने हातमिळवणी केल्याने राजकीय दृष्ट्या या निवडणुकीकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे.

दरम्यान, आज (दि. 19) शरद पवार-आशिष शेलार यांच्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बैठक घेतली. यावेळी शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर बसल्याचे दिसून आले.

जाहीर कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी एकमेकांशी गरवारे क्लबमध्ये चर्चा केली. ही चर्चा मते मिळवणे आणि फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या अमोल काळे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल होती की अन्य विषयावर याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

दुसरीकडे एमसीए निवडणुकीतले उमेदवार आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या वाहनापर्यंत गेले .मग पवारसाहेबांनी त्यांना गाडीत बसवले. प्रवासादरम्यान या दोघांची काय चर्चा झाली याबद्दल प्रचंड कुतुहल आहे. नार्वेकरांना जिंकण्यासाठी काय काय करायला हवे याची माहिती पवारसाहेबांनी दिल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT