गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे पक्ष आता महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सध्या राज्यात आहे. असे असूनही, तिन्ही पक्षांती काही नेते आणि कार्यकर्त्यांचा मेळ बसलेला दिसत नाही.
अशातच भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मेधा कुलकर्णी यांनी बारामतीमधील एका कार्यक्रमाचा आणि आमदार अमोल मिटकरी यांच्याबाबतचा एक दावा केला आहे.
कुलकर्णी म्हणाल्या, आपल्या पुरोहिताची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही असा निर्णय मी राष्ट्रावादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्य बाबत घेतला होता. बारामतीमध्ये एक सभा होणार होती. या सभेला मिटकरीही येणार असल्याते समजता मेटकरी ज्या व्यासपीठावर असतील त्यावर आपण कधीच येणार नाही अशी भूमिका मी घेतली. त्यानंतर मिटकरी त्या सभेला आलेच नाहीत. त्यामुळे जे चुकीचे आहे त्याला चुकीचे म्हणा असे म्हणत अमोल मिटकरीच्या बाबतीतचा हा किस्सा स्वतः खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितला.
पुढे बोलताना खासदार कुलकर्णी म्हणाल्या, देशातील सर्व हिंदूंना एकत्र आणायचे आहे. देशाची प्रगती करण्याच्या कामासाठी एकटे मोदी, फडणवीस पुरणार नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनीच देशासाठी काम करायला पाहिजे.
ब्राह्मण समाज चुकत असेल तर नक्की ऐकून घ्या. त्यामध्ये दुरुस्ती करा. मात्र विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचे नाही असेही मेधा कुलकर्णी म्हणाल्या. ब्राह्मण समाज साडेतीन टक्के आहे. त्यांच्यावर विविध कारणांमुळे टीका होत असते. ब्राह्मण समाजावर होणारी टीका व नकारात्मक भावना कामाच्या माध्यमातून नष्ट करा असे आवाहन खासदार मेधा कुलकर्णी यांनी केले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले आमदार अमोल मिटकरी त्यांच्या आक्रमक भाषण शैलीसाठी ओळखले जातात. याचबरोब अनेकदा राज्यातील विविध ठिकाणी त्यांनी केलेल्या विधानांमुळे वाद निर्माण झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.