Medha Kulkarni esakal
महाराष्ट्र बातम्या

Medha Kulkarni: मेधा कुलकर्णी यांना व्हायचयं पुण्याचं खासदार; चंद्रकांत पाटलांसाठी सोडली होती विधानसभा

सकाळ डिजिटल टीम

पुणेः चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरुड विधानसभेचं सीट सोडलेल्या भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी आधीच रस्सीखेच सुरु असून त्यात पुन्हा नवीन नाव पुढे आलेलं याहे.

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर पोटनिवडणूक होईल की नाही, याबाबत संभ्रम आहे. मात्र राष्ट्रवादी आणि भाजपमधून इच्छूकांची नावे पुढे येत आहेत.

हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरुड विधानसभा मतदारसंघ सोडला होते. त्यामुळे भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. शिवाय पक्षाने संधी दिली तर पुणे लोकसभा लढवण्यासाठी तयार असल्याचं खुद्द मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

कुलकर्णी म्हणाल्या की, पुणे लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत आहे. पक्षाने विश्वास दाखवला तर मी नक्कीच निवडणुकीच्या मैदानात उतरेन. आजपर्यंत मी पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत.

'विधानसभा निवडणुकीवेळी मी पक्षाचा आदेश पाळला होता. आताही पक्षाने आदेश दिला तर पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवेन' अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिलीय.

गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. येथे पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपमधून संजय काकडे, जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ यांची नावं चर्चेत आहेत.

आता मेधा कुलकर्णी यांचंही नाव पुढे येत आहे. महत्त्वाचं म्हणजे गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांचंही नाव आघाडीवर आहे. निवडणूक जाहीर झाली तर भाजप कोणाला उमेदवारी देणार, हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: CRPF जवानाची बायको अन् टोल कर्मचाऱ्यामध्ये जुंपली! एकमेकांच्या झिंज्या पकडून फ्रीस्टाईल हाणामारी

Health Tips : टॉयलेट सीटवर बसून टाईमपास करणं महागात पडेल, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा, सवय बदला नाहीतर...

Latest Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीस शिवाजीपार्क येथे दाखल

Solapur Travel Place : हिवाळ्यात फिरायला जायचं प्लॅन करताय, हे ठिकाणे नक्की एक्सप्लोर करा

AUS vs PAK: ग्लेन मॅक्सवेलने पाकिस्तानला 'गर्रगर्र...' फिरून धुलते; नंतर गोलंदाजांनी नाक घासायला लावले, बिच्चारे वाईट हरले

SCROLL FOR NEXT