Shambhuraj Desai sakal media
महाराष्ट्र बातम्या

कोयनेच्या बोटिंसाठी मंत्रालयात बैठक; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंची माहिती

विजय लाड

कोयनानगर : एका महिन्यात कोयना धरण (Koyana Dam) पाणलोट क्षेत्रातील सात किलोमीटर प्रतिबंधित क्षेत्र वगळण्याची कार्यवाही करण्यास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी स्वतः लक्ष घालून मंत्रालयात बैठक (Maharashtra Government) आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बोटिंग सुरू (Boating facility) होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. धरणाच्या शिवसागर जलाशयातील सात किलोमीटर क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. एका महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन हे क्षेत्र वगळण्यात येईल. राज्य शासन याबाबत सकारात्मक आहे. प्रतिबंधित क्षेत्रातून हे क्षेत्र वगळ्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून बंद असणाऱ्या कोयना धरणातील कळीचा मुद्दा ठरलेला बोटिंगचा विषय मार्गी लागणार असल्याचा विश्वास मंत्री देसाई यांनी व्यक्त केला आहे.

यामुळे कोयना धरणाच्या जलाशयात बोटिंग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्री देसाई म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी शासनाने कोयना धरणातील बंद असलेले बोटिंग सुरू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय आपल्या मागणीवरून घेतला होता. कोयना धरण व शिवसागर जलाशय हे प्रतिबंधित क्षेत्र असल्याने हे क्षेत्र वगळल्‍यानंतरच या ठिकाणी बोटिंग सुरू होईल. ही वगळण्याची प्रक्रिया किचकट असून ती अंतिम टप्‍प्यात आहे. लवकरच मंत्रालयात याबाबतची एक बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढला जाईल.’’

मानाईनगरवर शिक्कामोर्तबची शक्यता

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील सात किलोमीटर परिसरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळण्यात येणार आहे. त्यामुळे मानाईनगर येथील यमकर या ठिकाणी बोटिंग स्पॉट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर याच परिसरात मासेमारीला परवानगी, शेती सिंचनाला पाणी परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

Disha Patni : दिशा पटनीच्या वडिलांची झाली फसवणूक ; अध्यक्ष बनवण्यासाठी तब्बल 25 लाखांचा गंडा

अख्खं कुटुंबच उद्‌ध्वस्त झाल्याने चांदीनगरी हळहळली; शत्रूच्याही वाट्याला न यावा असा दुर्दैवी प्रसंग, नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT