Daya Nayak Net Worth esakal
महाराष्ट्र बातम्या

११६ कोटींचे ‘मेफेड्रोन' जप्त! एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या पथकाची कारवाई; सोलापूरचे दोघे अटकेत

मुंबई गुन्हे शाखा क्र. ९च्या पथकाने चिंचोळी MIDCतील एका कारखान्यावर धडक कारवाई करीत सील ठोकले आहे. मुंबईत १६ कोटींचे मेफेड्रोन ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या सोलापूरच्या दोघांना या पथकाने जेरबंद केल्यानंतर सोलापुरातील छाप्यात हा मुद्देमाल ११६ कोटींवर गेला आहे.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : मुंबई गुन्हे शाखा क्र. ९च्या पथकाने चिंचोळी (सोलापूर) एमआयडीसीतील एका कारखान्यावर धडक कारवाई करीत सील ठोकले आहे. मुंबईत १६ कोटींचे मेफेड्रोन ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या सोलापूरच्या दोघांना या पथकाने जेरबंद केल्यानंतर सोलापुरातील छाप्यात हा मुद्देमाल ११६ कोटींवर गेला आहे. या पथकाचे प्रमुख तथा एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे मुंबई क्राईम ब्रँचचे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी ‘सकाळ'ला सांगितले.

अंमली पदार्थाच्या वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याकरिता मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करीत असताना खार पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन इसम मेफेड्रोन (एमडी ) या अंमली पदार्थाचा मोठा साठा घेवून येणार असल्याची खबर गुन्हा अन्वेषण विभाग, मुंबईचे प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर कक्ष ९ च्या पथकाने मुंबईतील खार (प.) येथील खारदांडाच्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या खळा मैदान येथे सापळा रचून दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यातील एकाकडून एकूण पाच कोटी नऊ लाख ४० हजारांचे दोन किलो ५४७ ग्रॅम एम.डी., दुसऱ्याकडून पाच कोटी आठ लाख ४० हजारांचे दोन किलो ५४२ ग्रॅम एम.डी. मिळाले. दोन्ही ड्राग्जची आंतरराष्ट्रीय बाजरातील मूल्य दहा कोटी १७ लाख ८० हजार रूपये आहे. शासनाने बंदी घातलेल्या या अंमली पदार्थाचा साठा जप्त करून दोघांविरुद्ध खार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तपासादरम्यान अटकेतील दोघांकडे सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसीतील एका कंपनीत आणखी मेफेड्रोन असल्याची माहिती मिळाली. तेथील छाप्यात तीन किलो तयार मेफेड्रोन मिळून आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सहा कोटी एक लाख २० हजार आहे. चिंचोळीतील कारखान्यात शंभर कोटींचे ५० ते ६० किलो मेफेड्रोन (कच्चे) आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. त्यांची फॅक्टरी मुंबईच्या पोलिसांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून सील करण्यात आली आहे.

या पथकाची धडक कारवाई

ही कारवाई पोलिस निरीक्षक दया नायक, सचिन पुराणीक, दीपक पवार, सहा. पोलिस निरीक्षक उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, हवालदार सुभाष शिंदे, सुनील महाळसंख, संजय भोसले, जितेंद्र शिंदे, दत्तात्रय कोळी, सचिन राऊत, संतोष लोखंडे, महेश मोहिते, राहूल पवार, बाबासाहेब शेळके, विनय चौगुले, वैभव पाटील, साधना सावंत, प्रशांत भूमकर, अमोल सोनवणे, शार्दूल बनसोडे, राकेश कदम, सुशांत गवते, प्राजक्ता धुमाळ, गीतेश कदम, वाहन चालक विनायक परब, अविनाश झोडगे, निशिकांत निकम, प्रशांत साळवी, स्वप्निल गुरव यांच्या पथकाने केली.

पैसा मिळविण्यासाठी शक्कल

राहूल व अतुल गवळी हे चिंचोळी एमआयडीसीत सेन्की नामक केमिकल फॅक्टरी चालवित होते. त्यासाठी त्यांनी कारखान्याच्या मालकाकडून दरमहा तीस हजारांच्या भाड्याने कारखाना घेतला होता. त्यातील दोन हजार चौरस फूट जागेत प्रयोगशाळा होती. उर्वरित २१ हजार चौरस फुट जागेत कच्चे केमिकल ठेवले होते. या व्यवसायात त्यांना नुकसान आल्याने त्यांनी ड्रगमधून पैसा मिळविण्यासाटी शक्कल लढविली. त्यातून ते अडचणीत आले.

११६ कोटींचा मुद्देमाल जप्त

एकूण तपासात अद्यापपर्यंत अटकेतील दोघांकडून तसेच त्यांच्या सोलापूर येथील कंपनीमधून १६ कोटी १९ लाख किंमतीचे आठ किलो तयार मेफेड्रोन (एमडी) व अंदाने शंभर कोटींचा सुमारे ५० ते ६० किलो निर्माणाधिन मेफेड्रोन (एमडी)चा मिळून आले.

- राज तिलक रोशन, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, मुंबई

ठळक बाबी...

  • - मुंबई क्राईम ब्रॅंचच्या ९ नंबर पथकाने केली जप्तीची धडक कारवाई

  • - ‘एमडी’ ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईत आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

  • - न्यायालयाने दोघांनाही ठोठावली १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

  • - सोलापूरमधील राहुल किसन गवळी व अतुल किसन गवळी यांना अटक

तो कारखाना कोणाचा आहे, याबाबत मुंबई गुन्हे शाखा माहिती देईल

मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यांनी दोघांना अटक केली आहे. ते दोघेही कारखान्यात काम करीत होते. तो कारखाना कोणाचा आहे, याबाबत मुंबई गुन्हे शाखा माहिती देईल.

- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT