pravin darekar sakal media
महाराष्ट्र बातम्या

सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करतंय; प्रवीण दरेकरांची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आरोग्य भरती घोटाळा, पेपरफुटीच्या प्रकरणांनी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हैराण असतानाच आता याचप्रकारचं आणखी एक ढिसाळ कारभाराचं उदाहरण समोर आलं आहे. राज्यातील म्हाडाच्या परीक्षा (MHADA Exam Cancelled) ऐनवेळी रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारच्या ढिसाळ कारभारामुळे संतप्त असणारे विद्यार्थी आणखीनच क्रोधित झाले आहेत. या गैरकारभारावरून आता राज्यात महाविकास आघाडी सरकारवर (Maha vikas Aghadi) टीका केली जातेय. याबाबत टीका करताना प्रवीण दरेकर यांनी हे सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करत असल्याची जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय की, हे सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करत आहे. परीक्षार्थी परीक्षेच्या तयारीत असताना आदल्या रात्री परीक्षा रद्द करण्याचं पाप हे सरकार करतंय. पूर्णपणे या सरकारने बट्ट्याबोळ केला आहे. आरोग्य सेवकांच्या बाबतीतही तेच झाले, एमपीएससीच्या बाबतीतही अशीच दुरावस्था झाली. सरकार कुठल्याही बाबतीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत गंभीर नाहीये. या परीक्षेच्या माध्यमातून आपली लोक घेणे, भ्रष्टाचार करणे, हे तर यात लपलं नाही ना, असा संशय येत आहे. याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. या प्रकरणी संबधित व्यक्तींनी प्रायश्चित घेतले पाहिजे, असं मत प्रवीण दरेकर यांनी मांडलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही असा सवाल विचारला आहे. नोकरी देऊ शकत नसाल तर अशी थट्टा तरी करू नका असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

म्हाडाकडून (MHADA) आयोजित करण्यात आलेली परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा ५६५ जागांसाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. एकीकडे आरोग्यभरतीचा गोंधळ ताजा आहे. पेपरफुटीचं प्रकरणही नुकतंच उघडकीस येत असताना आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ झाल्याने राज्य सरकारवर विद्यार्थ्यांकडून टीका करण्यात येत आहे. ही परीक्षा ऐन मध्यरात्री रद्द केल्याने संताप व्यक्त केला जातो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT