MLC Election 2024 Milind Narvekar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Milind Narvekar: नार्वेकरांना विजयी करण्यासाठी ठाकरे आणि काँग्रेसमध्ये नेमकं काय ठरलं? वाचा महाविकास आघाडीचा मेगाप्लॅन

Maharashtra MLC Election: या निवडणुकीत एक उमेदवार विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा ठरला आहे. अशात ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त 15 आणि 1 अपक्ष अशी 16 मते आहेत.

आशुतोष मसगौंडे

राज्यात आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठीच्या मतदानाला सकाळी 9 वाजता सुरूवात होणार आहे. यापूर्वी महाविकास आघाडीने ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना विजयी करण्यासाठी मोठा प्लॅन आखल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा प्लॅन व्यवस्थित पार पडला तर मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.

या निवडणुकीत एक उमेदवार विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा ठरला आहे. अशात ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त 15 आणि 1 अपक्ष अशी 16 मते आहेत. अशा परिस्थितीत नार्वेकर यांना निवडून येण्यासाठी आणखी 7 मतांची गरज आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडे 37 मते असून त्यांनी ते त्यांची 27 ते 30 मते प्रज्ञा सातव यांना देणार आहेत. प्रज्ञा सातव यांना मतांचा कोटा दिल्यानंतर 7 ते 10 मते काँग्रेसकडे शिल्लक राहतात ही मते काँग्रेस नार्वेकरांना देणार आहे.

असा आहे प्लॅन

दरम्यान काँग्रेसची एकूण मते 37 मते असली तरी या निवडणुकीत काँग्रसची 3 ते 4 मतं फुटणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर ही 4 मते फुटली तर काँग्रेसकडे 33 मते शिल्लक राहतात. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना काँग्रेस ज्येष्ठ आणि विश्वासू आमदारांचा 27-30 मतांचा कोटा प्रज्ञा सातव यांना देणार आहे. यामुळे प्रज्ञा सातव यांचा मतांचा कोटा वाया जाणार नाही. यावेळी हा गट मिलिंद नार्वेकर यांना द्वितीय प्राधान्य ठेवणार. त्यामुळे जर कोणतीही चूक न होता प्रज्ञा सातव यांचा निर्णायक 23 मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर 4-7 मते शिल्लक राहतात. याशिवाय उर्वरित जी 7 ते 10 मते शिल्लक आहेत ती देखील नार्वेकरांना मिळतील. त्यामुळे नार्वेकरांचा विजय सुकर होईल.

कोणत्या पक्षाची कोणाला उमेदवारी?

भाजपाचे उमेदवार

  1. पंकजा मुंडे

  2. अमित बोरखे

  3. सदाभाऊ खोत

  4. योगेश टिळेकर

  5. परिणय फुके

शिवसेना (एकनाथ शिंदे)

  1. कृपाल तुमणे

  2. भावना गवळी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

  1. शिवाजीराव गरजे

  2. राजेश विटेकर

काँग्रेस

  1. डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शेतकरी कामगार पक्ष (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा)

  1. जयंत पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  1. मिलिंद नार्वेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT