Vijay Wadettiwar sakal
महाराष्ट्र बातम्या

Vijay Wadettiwar : ‘दुग्धविकास’ची जमीन अदानींच्या घशात;वडेट्टीवार

सकाळ वृत्तसेवा

‘‘मुंबई राजरोसपणे लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडेआठ हेक्टर जागा उद्योगपती अदानींच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा,’’ असे आवाहन करत जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. अदानी पूर्ण मुंबई साफ करीत आहेत. त्यांना राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी विधानसभेत मुंबईतील जमिनी हस्तांतराचा मुद्दा उपस्थित केला.

‘‘कुर्ला येथील दुग्धशाळेची जमीन साडेआठ हेक्टर आहे. दहा जून २०२४ रोजी एकाच दिवशी ही जमीन पशुसंवर्धन विभाग ते महसूल विभाग ते अदानी यांना हस्तांतरित केली गेली. हे हस्तांतर एकाच दिवसात झाले. इतकी तप्तरता कशी,’’ असा सवाल त्यांनी केला. या जमिनीचे मूल्यांकन किती आहे? जमिनीवरील एफएसआयचे मूल्यांकन किती होते?

जमिनीचे किंमत वीस हजार कोटी रुपये होते तरीही रेडीरेकनरच्या केवळ २५ टक्के दराने जमीन दिली गेली आहे, असा आक्षेपही विरोधी पक्षनेत्यांनी घेतला. हस्तांतरणासंदर्भात तत्कालीन पशुसंवर्धन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी काय शिफारशी केल्या होत्या. तुकाराम मुंडे यांनी केलेली सूचना अनुकूल नव्हती म्हणून त्यांची बदली करण्यात आली, असा आरोप करत सभागृहाला माहिती देण्याची त्यांनी मागणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT