Milk Price sakal
महाराष्ट्र बातम्या

Milk Price : दुधाला दर हवा; आजपासून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त करण्यासाठी दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्तारोको, उपोषणे, निदर्शने सुरू केली आहेत. सरकारने याची दखल घ्यावी व दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्या, असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सरकारला केले आहे.

दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारपासून (ता.२८) राज्यात अधिक आक्रमकपणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.२९) दूध दरवाढी संदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी व दूध उत्पादक शेतकरी यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढला जाणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

दरात तोटा

गेले वर्षभर दूध दराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रति लिटर १० ते १५ रुपयांचा तोटा त्यांना सहन करावा लागत आहे. सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान ४० रुपये दर द्यावा, दूध अनुदान पुन्हा सुरु करावे, वाढता उत्पादनखर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर दहा रुपये करावे, अनुदान बंद असताना दूध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावे आदी मागण्या संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

किसान सभा व समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT