सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून कौटुंबिक परिस्थिती बिकट असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना शाळेला जाता आले नाही.
सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील पहिली ते बारावीतील सव्वादोन कोटी विद्यार्थ्यांपैकी 60 लाख 18 हजार 303 विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून (Maharashtra State Transport Corporation) दरवर्षी 440 कोटी 28 लाख रुपयांची सवलत दिली जाते. आता जवळपास एक लाख शाळा (School) ऑफलाइन सुरू झाल्या आहेत. मात्र, सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरू असून कौटुंबिक परिस्थिती बिकट असलेल्या काही विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नसल्याचे पालकांकडून सांगण्यात आले.
कोरोनाचा (Covid-19) पहिला रुग्ण आढळल्यानंतर मार्च 2020 मध्ये राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले. काही दिवसांसाठी पाचवी ते सातवीचेही वर्ग सुरू झाले. मात्र, कोरोना वाढल्याने पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या. चिंतेची बाब म्हणजे, मार्च 2020 पासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरूच झाले नाहीत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू झाले, परंतु अँड्रॉईड मोबाईल नसलेले विद्यार्थी विशेषत: ग्रामीण भागातील, शहरातील झोपडपट्ट्यांमधील विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहिले. ते विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नयेत, त्यांच्यातील शिक्षणाची गोडी कमी होणार नाही, याची खबरदारी घेऊन शालेय शिक्षण विभागाने सर्वच शाळा उघडण्याचा निर्णय घेतला.
खेड्यापाड्यापर्यंत पोचलेल्या एसटी बसच्या माध्यमातून ग्रामीणमधील मुले तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेतून बारावीपर्यंतच्या मुलींना बसमधून मोफत प्रवासाची सवलत आहे. दरम्यान, अँड्रॉईड मोबाईल नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून दूर राहिलेले विद्यार्थी आता एसटी बंद असल्याने पदरमोड करून शाळेत जातील का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अजूनही 74 हजारांपर्यंत कर्मचारी एसटी संपात सहभागी असून साडेतेरा हजार बसगाड्या जागेवरच आहेत.
शाळा व विद्यार्थ्यांची स्थिती...
एकूण शाळा : 1,10,229
पहिली ते चौथीचे विद्यार्थी : 98,45,508
पाचवी ते बारावीतील विद्यार्थी : 1,23,29,117
एसटी सवलतीचे लाभार्थी : 60,18,303
सवलतीची रक्कम : 440.28 कोटी
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये आता ऑफलाइन सुरू झाले आहेत. 60 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाकडून प्रवासाची सवलत दिली जाते. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांचे नुकसान होत आहे. एसटीचे नुकसान टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन आहे.
- अॅड. अनिल परब, परिवहनमंत्री
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.