या बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. गाडीत चालकासह दहा ते अकरा प्रवासी होते.
Bus Accident News : भोर-महाड मार्गावरील (Bhor-Mahad Route) वरंधा घाटात (Varandha Ghat) मिनी बसबाबत (Mini bus accident) मोठी दुर्घटना घडलीये. वारवंड ते शिरगावदरम्यान शिरगाव (ता. भोर) हद्दीत पुणे स्वारगेटहून भोरमार्गे महाड-चिपळूणकडे जाणाऱ्या सतरा सिटर मिनी बसचा (एमएच ०८ एपी १५३०) अपघात झाला आहे.
हा अपघात शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळलीये. धरणाच्या पाण्यापासून पाच फुटांवर गाडी अधांतरीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या अपघातात बसचालक अजिंक्य कोलते यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय.
या बसमधील इतर सर्व प्रवासी सुखरुप आहेत. गाडीत चालकासह दहा ते अकरा प्रवासी होते. त्यातील तीन ते चार जण जखमी झालेत. जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. अपघात झाल्यानंतर गाडीतील चार जण कसेबसे दरीतून रस्त्यावर आले. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनचालकाने अपघात स्थळापासून जवळच असलेल्या सह्याद्री हॉटेल मालकाला या अपघाताची माहिती दिली.
त्यानंतर लागलीच हॉटेल मालक दत्ता पोळ, अक्षय धुमाळ, भीमा पोळ, संतोष पवार या शिरगावच्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन अधांतरीत असलेल्या बसला प्रथम दोरीने बांधले व त्यानंतर अपघातग्रस्त गाडीतीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.
तसेच या घटनेची माहिती कळताच भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलिस हवालदार दत्तात्रय खेंगरे, सुनील चव्हाण, चेतन कुंभार, अतुल मोरे, सह्याद्री रेस्क्यूचे सचिन देशमुख व टीमने घटनास्थळी पोचून अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यास मदत करुन जखमींना रुग्णालयात पाठवले. यावेळी घटनास्थळी आंबवडे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत मांगले, चिकन मंजुश्री चिकणे, दिलीप देवघरे हजर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.