ऐतिहासिक क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.
सिंधुदुर्ग (कोकण) : ऐतिहासिक क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. या विमानतळाच्या निमित्तानं उज्ज्वल भविष्याचा समृद्ध विकास घडविण्यासाठी आपण राजकारण बाजूला सारुन एकत्र आलं पाहिजे. 1992 साली सर्वप्रथम स्वर्गीय माधवराव सिंधिया (Madhavrao Scindia) यांनी या विमानतळाची (Sindhudurg chipi Airport) संकल्पना मांडली. ती आता उदयास आली आहे. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनीही पंतप्रधान असताना यासाठी प्रयत्न केला आहे, असं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मांडले. ते सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास आठवले, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे देखील ऑनलाइन उपस्थित होते. थोरात पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोकणात विविध प्रकारची कामं होत आहेत. येथील एमआयडीसीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळालाय. आजचा दिवस खूपच महत्वाचा असून या चिपी विमानतळ उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो आहोत. कोकणचा पर्यटन विकास साधण्यासाठी सरकारकडून लागेल ती मदत आम्ही करु, असं आश्वासन देत ते म्हणाले, कोकण समृद्ध आहे, त्याला आणखी समृध्द करण्यासाठी आपण राजकारण बाजूला सारुन एकत्र यायला हवं. पर्यटन ही कोकणाला लाभलेली मोठी देणगी आहे. मान्सूनच्या पहिला पावसाची सुरुवातही कोकणातूनच होते, इथल्या पहिला पावसातील मातीचा सुगंध, एक वेगळा आनंद देऊन जातो.
पुढच्या काळात समृद्ध कोकण घडविण्यासाठी सरकारकडून आम्ही मदत करुच, शिवाय इथे रोजगारही उपलब्ध करुन देऊ. लघु उद्योगाच्या माध्यमातून इथे रोजगार निर्मिती केली जाईल. इथल्या पर्यटनाला देखील चालना देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आजची ही सुरुवात एका नव्या युगाची सुरुवात असून कोकणासाठी ती लाभदायक ठरणार आहे. नवी मुंबईचे विमानतळसुद्धा लवकरच होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेवटी त्यांनी चिपी विमानतळाच्या योगदानाबद्दल ज्यांनी कष्ट घेतले, त्यांना मनापासून धन्यवाद दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.