Minister Girish Mahajan  
महाराष्ट्र बातम्या

Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजनांचे विमान बराच काळ हवेतच, सतर्कतेने टळला धोका!

हेमंत पवार

कऱ्हाड: येथील विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरु आहे. त्याअंतर्गत तीन ते चार विमानाव्दारे विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षण दिले जाते. आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन येथील विमानतळावर उतरुन सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी रवाना होणार होते. त्यासाठी त्यांचे विमान १० वाजून ५० मिनिटांनी येथील विमानतळाच्या हद्दीत आले.

मात्र त्यांच्या विमानाच्या पायलटला ट्रेनिंग सेंटरचे एक विमान हवेत आणि एक धावपट्टीवर दिसले. त्यामुळे त्या पायलटने विमान उतरण्याचा धोका न पत्करता हवेतच काहीकाळ विमान स्टे करुन धावपट्टी क्लीअर झाल्यावर विमान उतरले. विमान उतरल्यानंतर मंत्री महाजन आणि पायलट या दोघांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती विमानतळ म्हणून येथील विमानतळाची गणना केली जाते. या विमानतळावर सध्या ट्रेनिंग सेंटर सुरु आहे. त्याव्दारे विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु आहे. दरम्यान आज सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमास रवाना होण्यासाठी मंत्री गिरीश महाजन येथील विमानतळावर उतरणार होते. त्यासाठी भाजपचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, पोलिसांचा लवाजमा साडेनऊ वाजल्यापासूनच विमानतळावर तैनात होता. शासकीय दौऱ्याच्या सुमारे तासभर त्यांना यायला उशीर झाला.

दरम्यान त्यांचे व्हीटीएनकेएफ हे विमान कऱ्हाड विमानतळाच्या परिसरात आल्यावर ते लगेच उतरेल यासाठी विमानतळाची यंत्रणा सज्ज झाली होती. मात्र त्याचदरम्यान मंत्री महाजन ज्या विमानाने आले त्या विमानाच्या पायलटला ट्रेनिंग सेंटरचे एक विमान धावपट्टीवर तर एक हवेत दिसुन आले. त्या पायलटने त्याची कल्पना मंत्री महाजन यांना दिली. दरम्यान ट्रेनिंग सेंटरचे संबंधित विमान काही काळाने बाजुला गेले.

मात्र त्यादरम्यान मंत्री महाजन यांचे विमान बराच काळ हवेतच होते. पायलटने विमान उतरण्याचा धोका न पत्करता हवेतच काहीकाळ विमान स्टे करुन धावपट्टी क्लीअर झाल्यावर विमान उतरले. त्यामुळे धोका टळला. विमान उतरल्यानंतर मंत्री महाजन यांनी ट्रेनिंग सेंटरच्या विमानामुळे लेट झालो असे सांगीतले. तर पायलट यांनी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई यांच्याकडे नाराजी व्यक्त करुन व्हीआयपी दौऱ्यावेळी या विमानांची हालचाल बंद असायला हवी. ते विमान छोट्या इंजिनचे असते. त्यामुळे ते तातडीने बाजुला जात नाही असे सांगीतले. त्यानंतर प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी तशा सूचना विमानतळ व्यवस्थापनाला दिल्या.

"कऱ्हाड विमानतळावर व्हीआयपी दौऱ्यावेळी ट्रेनिंग सेंटरच्या विमानांच्या अॅक्टीव्हीटी व्हायला नको, असे मंत्री गिरीश महाजन यांना घेऊन आलेल्या विमानाच्या पायलटने सांगीतले. तशा सूचना विमानतळ व्यवस्थापनाला दिल्या आहेत."

अतुल म्हेत्रे, प्रांताधिकारी, कऱ्हाड


"मंत्री गिरीश महाजन यांच्या विमानाच्या पायलटने धावपट्टीवर ट्रेनींग सेंटरचे विमान दिसत असल्याने त्यांचे विमान उशीराने धावपट्टीवर उतरवले. त्या विमानाच्या पायलटने धावपट्टीवर विमान दिसत असल्यामुळे विमान लगेच उतरण्याचा धोका पत्करला नाही. त्यामुळे मी व्हीआयपी दौरा असताना ट्रेनिंग स्कुलचे कोणतेही विमान धावपट्टीवर किंवा हवेत येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना ट्रेनिंग स्कुलच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यापूर्वीही तशा सूचना दिल्या आहेत."

कृणाल देसाई, विमानतळ व्यवस्थापक, कऱ्हाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये चरबी कोण मिसळत होतं? अमित शाहांना लिहिलं पत्र

EY Pune: 'इतके मेलेले लोक, फक्त अंतिम संस्कार...', CAच्या मृत्यूनंतर अश्नीर ग्रोव्हरचा व्हिडिओ व्हायरल

NZ vs SL, Test : बॉल आला अन् कॅप्टन साऊदीने झपकन एकाच हाताने पकडला अफलातून कॅच, पाहा Video

Accident: चूक कोणाची? वेगाने Bike पळवणाऱ्या तरुणाची, की त्या SUV चालकाची.... थरार Video Viral

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

SCROLL FOR NEXT