vijay wadettiwar vijay wadettiwar
महाराष्ट्र बातम्या

'ओबीसीच्या राजकीय आरक्षणामध्ये इतर जातींनी हस्तक्षेप करू नये'

मराठवाड्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी औरंगाबादला महाज्योतीचे उपकेंद्र होईल ही घोषणाही मंत्री वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली

सुनिल इंगळे

मराठवाड्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी औरंगाबादला महाज्योतीचे उपकेंद्र होईल ही घोषणाही मंत्री वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली

औरंगाबाद: ओबीसी समाज आता जागा झाला आहे, ओबीसीच्या राजकीय आरक्षणात इतर जातींनी हस्तक्षेप करू नये. ओबीसी समाजाच्या पाठीशी सरकार म्हणून मी खंबीरपणे उभा राहणार असल्याचं वक्तव्य मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत केलं आहे. मंत्री वडेट्टीवार सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. वडेट्टीवारांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेत ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा मांडला. नुकतेच केंद्र सरकारने आरक्षणासाठी संदर्भात राज्यांना अधिकार दिल्याचे विधेयक पास केले आहे. परंतु केंद्र सरकारने लोकसभेत आणलेले आरक्षण संदर्भातील विधेयक हे स्वतःची जबाबदारी ढकलण्यासारखे आहे, यामुळे केंद्र सरकारची आरक्षणासंदर्भातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

महाज्योतीचे उपकेंद्र औरंगाबादेत-

सरकारने महाज्योतीसाठी आतापर्यंत १५० कोटींची तरतूद केली आहे. त्यातील ४० कोटींची निधी दिला आहे. तसेच मराठवाड्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी औरंगाबादला महाज्योतीचे उपकेंद्र होईल ही घोषणाही मंत्री वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

पंकजा मुंडे आणि फडणवीसांना अपयश-

ओबीसी समाजाचा एम्पिरिकल डाटा मिळवण्यासाठी या अगोदर देवेंद्र फडवणीस तसेच पंकजा मुंडे यांनी केंद्र शासनाला पत्रव्यवहार केला होता. परंतु केंद्र शासनाकडून त्याचा कोणताच पाठपुरावा करण्यात आला नाही. तसेच राज्य सरकारच्या वतीने नऊ पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. परंतु केंद्र हा डाटा देण्यास नकार देत असल्यामुळे राज्य सरकारने ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डाटा मिळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली आहे. तसेच न्यायालयातही यासंदर्भात प्रयत्न केले जात असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT