Miss Universe 2023 : मिस युनिवर्सबद्दलची उत्सुकता खूप दिवसांपासून लोकांमध्ये होती.. लवकरच याचे रिझल्ट समोर येतील.. मिस युनिवर्स ही सर्वात मोठ्या ब्युटी कॉम्पिटिशन पैकी एक कॉम्पिटिशन आहे. आत्ता पर्यंत भारतातून ३ मिस युनिवर्स जिंकल्या आहेत.सर्वात पहिल्यांदा १९९४ मध्ये सुश्मिता सेन ह्यांनी हा किताब पटकावला होता. आजही सुश्मिता सेन सर्व तरुण मुलींसाठी आदर्श आहे. पण आजही ब्युटी कॉम्पिटिशन म्हटलं की यासाठी कसं अप्लाय करायचं? नक्की याचं काय ट्रेनिंग आहे याबाबत पुरेपूर माहिती नाही.
मिस युनिव्हर्स ही सर्वात मोठी आणि दुसरी सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय ब्युटी कॉम्पिटिशन आहे जी जून 1952 मध्ये पॅसिफिक मिल्स या कॅलिफोर्नियाच्या कपड्यांच्या कंपनीने सुरू केली होती. ही ब्युटी कॉम्पिटिशन मिस युनिव्हर्स संस्थेद्वारे प्रशासित केली जाते आणि सध्या WME/IMG च्या मालकीची आहे. मिस युनिव्हर्स जगात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काम करते.
आर्मी कुसेला मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली महिला होत्या तर सुष्मिता सेन ही मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी भारतातील पहिली महिला होत्या. 2021 मध्ये भारताच्या हरनाज संधू यांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला.मिस युनिवर्ससाठी अप्लाय कोणीही थेट करू शकत नाही, जाणून घेऊया भारताकडून यासाठी तुम्ही नक्की कसं अप्लाय करू शकतात..
मिस दिवा
मिस युनिवर्ससाठी भारताकडून कोण रिप्रेझेंट करेल हे फेमिना मिस इंडिया असोसीएशन ठरवतं. यासाठी तुम्हाला मिस दिवा नावाची स्पर्धा जिंकावी लागते. मिस दिवा ही फेमिना मिस इंडिया स्पर्धेचा एक भाग आहे जी प्रामुख्याने चार मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्युटी स्पर्धांपैकी एक असलेल्या मिस युनिव्हर्ससाठी भारताच्या प्रतिनिधींची निवड करते.
मिस दिवा कॉम्पिटिशनसाठी कसं करावं अप्लाय?
मिस दिवा ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या काही निकष आहेत. जसे की उंची, वय, नॅशनॅलिटी आदि.. या निकषांमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्ही या कॉम्पिटिशनसाठी अप्लाय करू शकतात.
कोण करू शकतं मिस दिवासाठी अप्लाय?
१. मिस दिवासाठी तुमच वय १८ ते २७ मध्ये असावं
२. तुमच लग्न झालेलं नको किंवा तुम्ही कोणत्याही आपत्याच पालकत्व घेतलेलं नको
३. तुम्ही भारताचे नागरिक असावेत.
४. तृतीयपंथी इथे अप्लाय करू शकत नाही.
५. तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट असायला हवं.
कसं करावं मिस दिवासाठी अप्लाय?
यासाठी www. missdiva. com ही ऑफिशियल वेबसाईट आहे.
- मिस दिवा कॉम्पिटिशनसाठी संस्थेच्या ऑफिशियल साइटला भेट द्या, आणि तिथे रजिस्ट्रेशन करून सर्व नियम आणि अटी नीट वाचा.
- आता फॉर्ममध्ये आपली सगळी माहिती नीट भरून घ्या.
- यामध्ये तुम्हाला आपले काही फोटो अपलोड करावे लागतात, ज्यात ३ क्लोज-अप (उजवीकडून, डावीकडून अन् समोरून), मिड शॉट आणि लॉन्ग शॉट असे प्रकार असतात.
- जर तुम्ही त्यांच्या अटींशी सहमत असाल तर तिकडे तसं सिलेक्ट करून फॉर्म सबमिट करा.
- जर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म निवडला गेला, तर तुम्हाला तुमच्या ऑडिशन साठी कळवल जातं.
जर तुम्ही मिस दिवा ब्युटी कॉम्पिटिशन जिंकली तर तुम्हाला मिस युनिव्हर्स इंडिया या किताबाने ओळखलं जातं आणि तुम्ही मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.