anil parab esakal
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Case : ''वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा...'' अनिल परब यांनी उपस्थित केला 'हा' मुद्दा

संतोष कानडे

मुंबईः शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कार्यवाही आणि सुनावणी याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यावरुन ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केले असून अध्यक्षांनी निष्पक्षपातीपणे काम करुन वेळकाढूपणा करु नये, असं आवाहन केलंय.

काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देताना दिरंगाई करणार नाही. 13 ऑक्टोंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान युक्तीवाद होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

असं आहे वेळापत्रक

  • 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होईल

  • 23 नोव्हेंबरनंतर अंतिम सुनावणी दोन आठवड्यात होणार

  • 13 ऑक्टोबर - सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही, यावर सुनावणी संपन्न होईल

  • 13 ते 20 ऑक्टोबर - दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करेल

  • 20 ऑक्टोबर - सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल देण्यात येईल

  • 20 ऑक्टोबर- काही अधिकची कागदपत्र एखाद्या गटाला सादर करायची असतील, तर त्यासाठी त्यांना संधी दिली जाईल

  • 27 ऑक्टोबर- दोन्हीही गट आपापलं स्टेटमेंट मांडतील

  • 6 नोव्हेंबर- या तारखेपर्यंत दोन्ही गट आपापले मुद्देसूद मांडणी करतील व दावे आणि प्रतिदावे करतील

  • 10 नोव्हेंबर- दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडेल

  • 20 नोव्हेंबर- दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल

  • 23 नोव्हेंबर- साक्षीदारांची उलट साक्ष होईल

  • सर्व पुरावे तपासल्यानंतरच दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडेल

वेळापत्रकावर बोलताना अनिल परब म्हणाले की, साक्ष आणि तपासणी हे फक्त वेळ काढण्यासाठी आहेत. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत. सगळ्या आमदारांचा गुन्हा सारखा आहे त्यामुळे वेगवेगळी सुनावणी घेण्याची गरज नाही. सध्या केवळ वेळकाढूपणाचं धोरण सुरु असून त्यांनी निष्पक्षपातीपणे काम करावं, अशी अपेक्षा आहे. एका महिन्यामध्ये अपात्रता प्रकरण संपलं पाहिजे; असं शेवटी परब म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui murder case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतरही 'त्याचं' समाधान झालं नव्हतं; चक्क लीलावतीमध्ये...

Nagpur Accident: काॅंग्रेस नेते नितीन राऊत अपघातात बालंबाल बचावले, कारला ट्रकने धडक दिली अन्....

Mumbai Crime: गोराई बीचवरील हत्येचा उलगडा; मृतदेहाचे केले होते सात तुकडे, हातावरील टॅटूमुळे पटली ओळख

Children's Day Special Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चवदार रोटी पिझ्झा, सोपी आहे रेसिपी

Mumbai Police : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; रायचूरमधून गीतकाराला अटक

SCROLL FOR NEXT