येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही १५ जागा लढवू. साताऱ्यात माण- खटावमध्ये आमचा उमेदवार असेल, असे कडू यांनी सांगितले.
सातारा : कांदा खाणाऱ्यांसमोर (ग्राहक) सरकारची नामर्दगी असून, ते त्यांच्या आंदोलनाला घाबरत आहेत. शेतकऱ्यांसाठी शुल्क लावले जातेय म्हणून मी बोलतो. कोणी नाराज झाले तर त्याची मला परवा नाही. शेतकरी मरत आहे; पण त्यांच्यासाठी सरकारच्या भूमिका स्पष्ट नाहीत, अशी जहरी टीका दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष, आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली.
इस्लामपूरकडे जाताना श्री. कडू सातारा शासकीय विश्रामगृह येथे थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याने जे पैसे जमा होणार आहेत, ते सरकारने प्रतिक्विंटल मागे शेतकऱ्यांना दिले पाहिजेत. डिसेंबरमध्ये कांदा महाग होणार म्हणून आता निर्यात शुल्क लावून शेतकऱ्यांची गळचेपी केली जात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी जे करत होती, तेच आता भाजप करत आहेत. ग्राहकांची मने सांभाळली जात आहे. शेतकऱ्यांना भाव मिळतो, तेव्हा भाव कमी करण्यासाठी सरकार हस्तक्षेप करते; पण जेव्हा कांदा, टोमॅटो रस्त्यावर टाकायची वेळ येते, तेव्हा सरकार हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे सरकारने भाव वाढत असताना त्यात हस्तक्षेप करू नये.
एका बाजूला मेक इन इंडिया म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला जगाच्या व्यासपीठावर भारतीय कांद्याला महत्त्व जास्त आहे म्हणून निर्यात शुल्क लावला जात आहे. एक वर्षभर भारतीय लोकांनी कांदा न खाता सर्व शेतकऱ्यांचा कांदा निर्यात केला, तर सर्वच शेतकरी श्रीमंत होतील, इतका भाव कांद्याला मिळेल.
कडू पुढे म्हणाले, ‘‘१९८० मध्ये कांद्यावर निर्यात बंदी केली होती, तेव्हा ते जनता दलाचे सरकार पडले होते. आणीबाणीनंतर कांदा भाववाढीमुळे इंदिरा गांधींचे सरकार पडले होते. अटलबिहारी वाजपेयी यांचेही सरकार पडले. आता त्यांना पुन्हा भीती वाढत आहे, की भाव वाढले तर सरकार पडेल का? भाव वाढले तर सरकार पडते. मग, भाव पडले तर सरकार का पडत नाही? शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. आपला प्रभाव कमी होत आहे, त्याचे मतात रूपांतर होत नाही, याचे शेतकऱ्यांनी आत्मचिंतन करावे.’’
पदामागे एक हजार रुपये न घेता केरळ राज्याच्या धर्तीवर एकदाच उमेदवाराचे एक हजार रुपये घेऊन त्यांना परीक्षास बसण्यास मुभा द्यावी, तसेच या परीक्षा एमपीएससी मार्फत घ्याव्यात, असेही श्री. कडू म्हणाले.
शेतकरी, मजूर, कामगार, वंचित, दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदारांची संख्या वाढवणे प्रहार संघटनेसाठी आवश्यक आहे. आमचे सध्या दोन आमदार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही १५ जागा लढवू. साताऱ्यात माण- खटावमध्ये आमचा उमेदवार असेल, असे कडू यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.