Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट, शिंदे गटाकडून ६ हजार पानी उत्तर दाखल; निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष!

Sandip Kapde

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष प्रकरणात गाजलेल्या आमदार अपात्रतेप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी सहा हजार पानांचे लेखी उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवले आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव होती. त्यावर निकाल देताना कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलं होतं.

दरम्यान विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने केली होती. तर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे आता नार्वेकर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शेड्यूल १० प्रमाणे पक्ष फुटलेला नसताना विधिंडळात फूट झाली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांनी अपात्र करा, अशी ठाकरे गटाची याचिका होती.

शिंदे गटाने सहा हजार पानांचे उत्तद सादर केल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देण्यास वेळ मागू शकतात. (latest marathi news)

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्यासाठी दिलेल्या कालावधी संपला आहे. त्यामुळे नार्वेकर आता कधी निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना देखील शिंदे गटाच्या बाजूने अपात्रते संदर्भात नोटिस बजावण्यात आली आहे. यावर देखील उत्तर अपेक्षित आहे. त्यामुळे निकालासाठी आता आगामी विधानसभा निवडणुका उजाळणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरण वाढली; सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला, बँक निफ्टी 1000 अंकांनी कोसळला

IND vs NZ 2nd Test : Washington Sunder चा आणखी एक पराक्रम; मागील १६ वर्षांत अश्विन वगळता कोणालाच जमला नव्हता असा विक्रम

Mudra Loan: मोदी सरकारने दिवाळीत उद्योजकांना दिली मोठी भेट; आता मिळणार 20 लाखांच कर्ज

MVA Seat Sharing Formula : मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तिसऱ्यांदा बदलणार! थोरात म्हणाले, अजून बेरीज...

Hardik Pandya मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? आयपीएल रिटेंशनआधी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT