सातारा : माण येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला मध्यरात्री अपघात झाला. पुणे पंढरपूर रस्त्यावरील फलटण येथे त्यांची गाडी नदीत पडून गोरे आणि इतर तीनजण जबर जखमी झाले आहेत. तर त्यांना पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. शरद पवारांना चॅलेंज देणारे नेते म्हणून ओळख असलेले भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा प्रवास जाणून घेऊयात.
हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कमी वयात निवडून आलेले आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. गुंडगिरी केल्याच्या कारणावरून त्यांना गावातून बाहेर काढण्यात आलं होतं. तर त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि सदस्य म्हणून निवडून आले. 2009 मध्ये थेट विधानसभा निवडणूक लढवत ते जिंकून आले. राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख यांचे पारंपारिक विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे.
जयकुमार गोरे हे साताऱ्यातील माण येथील आमदार आहेत. ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. गोरे हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि जिंकले. तर 2019मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
माण विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे जयकुमार गोरेंची भूमिका महत्त्वाची ठरली होती. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असतानाही माणमध्ये जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वैर असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांच्यामध्ये कायम खटके उडत असल्याचं सांगण्यात येतं. 2019च्या विधानसभा निवडणुकासाठी त्यांनी सोलापुरात महाजनादेश यात्रेमध्ये अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.