Jitendra Awhad Oppose to Manusmriti in School Syllabus Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: महाडमध्ये चवदार तळ्यावर आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन; अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याला केला विरोध

Jitendra Awhad Oppose to Manusmriti in School Syllabus: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड याप्रकरणी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

शालेय अभ्यासक्रमात आराखड्यात मनुस्मृती, मनाचे श्लोक त्याचबरोबर भगवद्गीतेचे श्लोक घेण्यात आले आहे. याला राष्ट्रवादी शरद पवार गटाने तीव्र विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड याप्रकरणी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. आज महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करून विरोध व्यक्त केला आहे.

राज्यभरात मनुस्मृती अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये घेतल्यामुळे वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. तिसरी ते बारावीची पाठ्यपुस्तक बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी सुधारित अभ्यासक्रमाचा आरखडा देखील तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘एससीईआरटी’ने महाराष्ट्र राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला असून त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवल्या आहेत.

पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृती, मनाचे श्लोक व भगवद्गीतेचे श्लोक घेण्यात आले आहे. याला राष्ट्रवादी शरद पवार गटाने तीव्र विरोध आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर शिक्षणामध्ये मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. अभ्यासक्रमाच्या आरखड्यावर जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर त्यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन करत आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

मनुस्मृती जाळण्याच्या आणि समाजामध्ये कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. त्याचबरोबर मनुस्मृती दहन केल्याने काही लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. तसेच आदर्श आचारसंहिता चालू असल्याचे देखील महाड पोलिसांनी आव्हाडांना नोटीस बजावताना सांगितले आहे. पंरतु आव्हाड मनुस्मृती जाळण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

आमदार जितेंद्र आव्हाडांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या मनुस्मृतीतील अभ्यासक्रमात घेण्यात येणारे श्लोक चांगले असल्याच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाडांनी काय लिहलं आहे पोस्टमध्ये?

मनुस्मृती मध्ये अस्पृश्य, शूद्र व स्त्रियांबद्दल अन्यायकारक काही कायदे/श्लोक सुद्धा आहेत. या ग्रंथामुळे जातिव्यवस्था, अस्पृश्यता, जातिबंधने बळकट झालेली होती. त्यामुळे महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी सर्वप्रथम 'मनुस्मृती' ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले होते.

शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर हे म्हणतात की, "मनुस्मृतीमधील काही चांगले, बौद्धिक बळ देणारे श्लोक आम्ही शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणार आहोत." एकीकडे जातीद्वेष, जातीभेद, अस्पृश्यता आणि समाजातील सर्वच वर्गातील स्त्रियांबाबत अन्यायकारक असणाऱ्या मनुस्मृतीमधील काही गोष्टी केसरकर यांना आवडायला लागल्या आहेत. उद्या यांना सबंध मनुस्मृती आवडायला लागेल. मला माहित आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केसरकर यांची तुलनाच होऊ शकत नाही. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पुस्तक हीन आणि मानवतेविरोधात आहे, असे म्हटले आहे. तिथे त्या पुस्तकावर चर्चाच करणे अयोग्य आहे; ते ही महाराष्ट्रात! त्यामुळे केसरकर यांना किती कळतं, याबद्दल सबंध महाराष्ट्राला माहित आहे. अन् ते कुठल्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात, हेदेखील सबंध महाराष्ट्राला समजलेले आहे. आताच आम्ही महाडकडे निघालो आहोत. चलो महाड... पुन्हा एकदा मनुस्मृतीचे दहन करावेच लागेल. या सरकारला आपली ताकद दाखवावीच लागेल... बहुजनांनो, एक व्हा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT