प्रणिती शिंदे esakal
महाराष्ट्र बातम्या

आमदार प्रणिती शिंदे देणार विरोधकांना टक्कर! काँग्रेसचा विरोधक भाजप की राष्ट्रवादी?

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला आणि सरकार स्थापन केले. पण, पावणेतीन वर्षांनंतरही स्थानिक पातळीवर अजूनही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्याचे दिसत नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला आणि सरकार स्थापन केले. पण, पावणेतीन वर्षांनंतरही स्थानिक पातळीवर अजूनही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्याचे दिसत नाही. दुसरीकडे काँग्रेसमधील अनेकजण पक्ष सोडून जात आहेत. शिवसेना, भाजपमध्ये नव्हे तर ते नाराज राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत. त्यासाठी काही नेतेच फूस लावत असल्याची स्थिती आहे. शिवसेना शांत असून भाजपकडूनही तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे काँग्रेसचा नेमका विरोधक भाजप की राष्ट्रवादी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याला आमदार प्रणिती शिंदे कशापध्दतीने टक्कर देतील, याची उत्सुकता आहे.

ज्या सोलापूर जिल्ह्यातील सुशिलकुमार शिंदे यांनी राज्याचे नेतृत्व केले. देशात गृहमंत्र्यांपर्यंत झेप घेतली. त्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसची दुरावस्था झाली आहे. शहर मध्य वगळता जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. महापालिकेत सत्तेवर असलेला काँग्रेस मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेला. जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषदेतही काँग्रेसची पिछेहाट झाली. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राज्यभर दौरे वाढले असून शिवसेना मंत्रीदेखील जिल्हानिहाय दौरे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी पक्षातील प्रत्येक मंत्र्यास एका जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. पण, मंत्री ती जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत. दुसरीकडे पालकमंत्र्यांकडून शिवसेना, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत राष्ट्रवादीत पक्षांतर करणाऱ्यास इच्छुक असलेल्यांसह स्वत:च्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना भरघोस निधी मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसचे अनेक पदाधिकारी नाराज असून काहींनी पक्षही सोडण्याचीही तयारी केली आहे. तत्पूर्वी, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि आता माजी महापौर ॲड. यु. एन. बेरिया यांनी पक्ष सोडला आहे. दरम्यान, महापालिकेचा महापौर राष्ट्रवादीचा होण्यात काँग्रेसचाच प्रमुख अडथळा आहे. त्यामुळे नाराजांना आपलेसे करून काँग्रेसचे ‘हात’ कमकुवत करण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काहीजण करीत असल्याची चर्चा आहे. त्यावर आता आमदार प्रणिती शिंदे यांची भूमिका काय असणार, याची उत्सुकता आहे.

‘ईडी’विरोधात बोलणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव आमदार
जिल्ह्यातील भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील आमदार, माजी मंत्री हे ‘ईडी’विरोधात बोलताना सावध भूमिका घेतात तथा बोलतच नाहीत. माढ्यातील आमदार बबनराव शिंदे व त्यांचे चिरंजीव रणजितसिंह यांचीही एका तक्रारीवरून ‘ईडी’ने त्यांचीही चौकशी केली. त्यानंतर ‘ईडी’विरोधात बोलून आपल्यामागे पिडा लागू नये म्हणून त्यापासून काहीजण चार हात लांबच राहत असल्याची चर्चा आहे. पण, आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्येकवेळी ‘ईडी’च्या विरोधात असो वा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरपूस टीका केली. त्यांचा परखडपणा, भाषणशैलीमुळे अनेकजण त्यांचे चाहते आहेत.

महापालिकेसाठी प्रणितीताईच ब्रॅण्ड ॲम्बेसेडर
मोदी लाटेत काँग्रेस-राष्ट्रवादीची महापालिकेवरील सत्ता गेली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पिछेहाट झाली. विधानसभेला अनेकांनी बंडखोरी केली तर काहींनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरले. तरीही, प्रणिती शिंदे यांनी विजयाची हॅट्रीक केलीच. अलिकडे कोल्हापुरकरांनीही त्यांच्या भाषणाची झलक अनुभवली. दरम्यान, भाजपने महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुखांवर जबाबदारी सोपविली असून निवडणूक काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील सोलापुरात तळ ठोकून असतील. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेकजण सोलापूर दौऱ्यावर येतील. पण, काँग्रेसकडून ‘ताई’च ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून त्यांचा सामना करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT