Prithviraj Chavan esakal
महाराष्ट्र बातम्या

अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्र्यांची वर्णी शक्य

काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेणार अंतिम निर्णय

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रवादी व शिवसेनेने अनुभवी नेता देण्याची मागणी केलीय.

कऱ्हाड (सातारा) : विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी (Assembly Speaker) अनुभवी नेत्याची निवड व्हावी, असा मुद्दा पुढे आल्याने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुन्हा चर्चेत आले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचेही त्यावर एकमत होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे विधानसभा अध्‍यक्षपदी आमदार चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी (NCP) व शिवसेना (Shiv Sena) यांनी अनुभवी नेता देण्याची मागणी केली आहे, त्याला आमदार चव्हाण यांनीही दुजोरा दिला. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तिन्ही पक्षांच्या गोपनीय बैठकीतही आमदार चव्हाण यांच्या नावावर एकवाक्यता झाल्याचे वृत्त आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाला राष्ट्रवादी व शिवसेनेकडून विरोध झाल्याचे समजते. त्यामुळे ते नाव मागे पडून चव्हाण यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदावरून मुंबईत बैठका सुरू आहेत. त्यात विविध नेत्यांच्या नावांची चर्चा आहे. त्यापैकी आमदार थोपटे यांच्या नावाला राष्ट्रवादी व शिवसेनेने सहमती दर्शवली नसल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षांनी अनुभवी व्यक्ती देण्याची मागणी केल्याने आमदार चव्हाण यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याला काँग्रेसच्या निकटवर्तीय व विश्वसनीय सूत्रांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या नावाची चर्चा पुढे आली आहे.

विधानभवनात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महत्त्‍वाच्या नेत्यांची दुपारी बैठक झाली. त्या गोपनीय बैठकीत आमदार चव्हाण यांच्या नावावर एकमत झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी एक जाणकार व अनुभवी नेता असावा, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झाली. त्या अनुशंगाने अनुभवी नेत्याकडे ते पद द्यावे, यावर एकमत असून त्याबाबत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसकडे मागणी केली आहे. त्या अनुशंगाने विधानभवनात महत्त्‍वाची बैठक झाली. त्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले (Nana Patole), सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil), राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई उपस्थित होते. त्यात आमदार चव्हाण यांच्या नावावर बऱ्यापैकी नेत्यांचा होकार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्याबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनाही माहिती कळविण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT