Barsu Refinery News 
महाराष्ट्र बातम्या

Barsu Refinery News : बारसू रिफायनरी मुद्यावरुन राजकारणाला नवं वळण; ठाकरे गटात फूट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी मुद्यावरुन घमासान सुरु आहे.

धनश्री ओतारी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी मुद्यावरुन घमासान सुरु आहे. प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, या मुद्यामुळे राज्यातील राजकारणाला नवं वळणं लागलं आहे. बारसू रिफायनरी मुद्यावरुन ठाकरे गटात फूट पडल्याची चर्चा सुरु आहे. (MLA Rajan Salvi on Barsu Refinery Project uddhav thackeray Maharashtra Politics )

प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प होणारच अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. तर अद्याप उद्धव ठाकरेंनी मौन बाळगले आहे. अशातच स्थानिक शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी पाठिंबा दिला आहे.

'कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच....माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये....' असं ट्विट करत साळवी यांनी सत्ताधारी नेत्यांना टॅग केले आहे.

बारसू येथे रिफायनरी प्रकल्प राबवण्याकरता उद्धव ठाकरेंनी जागा सुचवली होती, असं उदय सामंत काल म्हणाले. मात्र, हा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावला आहे. नाणार आणि बारसू या दोन्ही जागांसंदर्भातील शिवसेनेच्या भूमिका स्पष्ट होत्या. नाणारला विरोध होता, लोक रस्त्यावर उतरले होते.

त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने केंद्राला बारसू ही पर्यायी जागा होऊ शकते, असं त्यांनी सुचवलं. पण लोकांचा विरोध असेल तर शिवेसना त्याला पाठिंबा देणार नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पर्यायी जागा सुचवली. आता जर लोक विरोध करण्यासाठी पुढे आले असतील, मरू पण जागा देणार नाहीत, अशी त्यांची भूमिका असेल तर त्या पत्राला आमच्या लेखी किंमत शुन्य. अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT