Maratha Reservation Shashikant Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation चा वेळीच निर्णय घ्या, अन्यथा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही; आमदार शिंदेंचा स्पष्ट इशारा

मराठा आरक्षणाविषयी सरकारने आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी.

सकाळ डिजिटल टीम

मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहे.

पळशी : मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा आहे. मराठा समाजातील सर्वसामान्यांच्या या जिव्हाळ्याच्या विषयाकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, याप्रश्नी सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यास स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणाविषयी सरकारने आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी. अन्यथा, संपूर्ण महाराष्ट्राचे अन्नधान्य बंद करण्याची ताकद माथाडी कामगार आणि माथाडी संघटनांमध्ये आहे, असा इशाराही आमदार शिंदे यांनी दिला आहे.

ल्हासुर्णे येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘माथाडी कामगारांचे आराध्य दैवत आमदार (कै.) अण्णासाहेब पाटील यांनी १९८० मध्ये राज्यात सर्वप्रथम मराठा आरक्षणाची हाक दिली होती. या आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांनी दिलेले बलिदान विसरता येणार नाही. त्यांच्यानंतर माथाडी संघटना १९८० पासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यात प्रत्येक वेळी उभा राहिलेल्या आंदोलनात माथाडी कामगारांनी आणि संघटनांनी भूमिका बजावली असून, याप्रश्नी आमची माथाडी कामगार संघटना कायम आग्रही राहिली आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने एक दिवस संप करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला होता. त्यानुसार मराठा आरक्षणाविषयी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी काल मुंबई बाजार समितीच्या आवारात माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन केले.

पोलिसांच्या विनंतीवरून केवळ फळबाजार आणि भाजीपाला बाजार सुरू ठेवला होता. माथाडी कामगार रस्त्यावर उतरतो, तेव्हा संपूर्ण राज्य थांबते, हे कालच्या आंदोलनातून आम्ही सरकारला दाखवून दिले आहे.’’ मनोज जरांगे-पाटील व मराठा तरुणांच्या भवितव्यासाठी सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी. अन्यथा, संपूर्ण महाराष्ट्राचे अन्नधान्य बंद करण्याची ताकद माथाडी कामगार आणि माथाडी संघटनांमध्ये आहे, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारला दिला आहे.

मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहे. याविषयी संधी मिळेल तेथे विधिमंडळामध्ये आणि रस्त्यावर देखील सरकारला जाब विचारणार आहे.

- शशिकांत शिंदे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT